माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते “महाराजस्व अभियानाचे”उदघाटन .
उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या आदेशाने बंद पडलेले अभियान पुन्हा सुरु झाले.!
मधूकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- शासनाच्या योजना अतिदुर्गम भागातील नागरीकां पर्यंत पोहोचत नसतात आणि पोहोचल्याच तरी तालुक्याला वारंवार तालुक्याला जावे लागत असतो म्हणुन नागरीक लाभापासुन वंचितच असायचे. कोणत्याही योजनांसाठी कागदपत्रांची जुळवा जुळव करणे हे गरीब निरक्षर जनतेसाठी अशक्य प्राय व्हायचे त्यावर उपाय म्हणुन महाराजस्व अभियानामार्फत शासनालाच जनतेच्या दारी पोहोचविण्याची योजना होती परंतु दुर्दैवाने बर्याच कालावधी पासुन ही योजना बंद होती. माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली आणि या भागासाठी हे अभियान फार गरजेचे असल्याचे लक्षात आणुन दिले.
यावेळी उपमख्यमंत्री देवेन्द्र फडणविस यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन हे अभियान पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला. अहेरी उपविभागात महाअभियान सुरु होणार असल्याचे जिल्हाधिकारी संजय मिना यांनी राजे कळवले व प्रशासनामार्फत राजे साहेबांना उदघाटन करण्याससाठी पाचारण करण्यात आले.
उदघाटनाच्या प्रसंगी प्रशासनाला तळागाळात पोहोचण्याचे आवाहन केले.शेवटच्या टोकाच्या व्यक्तीलासुध्दा योजनांचा लाभ पोहोचुन विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच जनतेने सुध्दा लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली जिल्ह्याचे माझी पालकमंत्री अम्बिशराव आत्राम यांनी केले आहे. या प्रसंगी ऊपविभागीय अधिकारी श्री अंकीत, माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम,सरपंच किरण नैताम आणि इतर विभागाचे अधिकारी ऊपस्थित होते.