माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी डीजेच्या तालावर धरला ठेका.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील महागाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवात गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सहभागी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच यावेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील होतकरू महिलांना श्री. आत्राम यांच्या हस्ते १५ शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले, याप्रसंगी उपस्थित सर्व भिमसैनिकांना संबोधित करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी तथागत मंडळ अध्यक्ष शंकर अलोने, माजी मुख्याध्यापक शंकर अलोने, नारायणजी अलोने व समस्त मंडळगण तसेच ग्रामपंचायतचे सरपंच पुष्पा मडावी, उपसरपंच संजयजी अलोने, सदस्य दिपाली कांबळे , सदस्य लालू वेलादी, सदस्य विनायकजी वेलादी, गावातील प्रतीष्ठीत विलासजी अलोने, नामदेवजी अलोने, राजकूमार कांबळे, श्रिकांत चालूरकर, राजेश करमे, ग्रा. कर्मचारी बाबूरावजी मोहूर्ले, सचिन करमे, हुरूप अलोने, शिक्षक राजारामजी रामटेके, श्रिनिवासजी अलोने, गौरूबाई मुंजमकर, महेश अलोने, शंकर दहागावकर, प्रविण द.दुर्गे, मुरलीधरजी झाडे यांच्यासह महागाव वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!