खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने तळोधी (मो) उपसा सिंचन प्रकल्प योजना 90 टक्के काम पुर्णत्वास
चामोर्शी तालुक्यातील चवदा व गडचिरोली तालुक्यातील दोन व गावातील शेतकऱ्यांच्या 1470 हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष लाभ.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली दिनांक -17 एप्रिल:- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या पुढाकाराने व अथक प्रयत्नांनी गडचिरोली तालुक्यातील तळोधी (मो ) उपसा सिंचन प्रकल्प 90 टक्के पूर्ण झाला आहे. सदर प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता 155 कोटी 46 लाख रुपये किंमतीची आहे व बंदनलिका वितरण कामाचे वितरण कामाचे प्रशासकीय मान्यता 109 कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली तालुक्यातील दोन व चामोर्शी तालुक्यातील चवदा गावे पूर्णपणे बारमाही सिंचनाखाली येणार आहे.
गडचिरोली तालुक्यातील दर्शनी (चक) दर्शनी (माल) चामोर्शी तालुक्यातील चवदा गाव कुणघाडा, बांधोना, मालेर (चक) नवतळा, जोगणा, तळोधी (मो) हीवरगाव, नवेगाव, खोर्दा (चक) विसापूर, भाडभिडी, गीलगाव, नवरगाव, मालेरमाल, सदर गावातील शेतकऱ्यांच्या शेतीना प्रत्यक्ष बारमाही सिंचन सुविधा मिळणार आहे. सद्यस्थितीत चालू असलेल्या कामापैकी, पंपगृह , उर्ध्वनलिका व पंपगृहाचे कामे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे तसेच बंदनलिका वितरण प्रणालीचे नवीन काम प्रत्यक्ष सुरू झालेले आहे. या सिंचन प्रकल्पचे कामामुळे एकूण सोळा गावांचे शेती पूर्णपणे सुजलाम सुफलाम होऊन या भागातील शेतकऱ्यांना बारमाही सिंचन सुविधा मिळणार आहे हा प्रकल्प व गडचिरोली जिल्ह्यातील कोटगल ब्यारेज येथील काम जोमाने सुरू आहे व चामोर्शी तालुक्यातील चीचदोह प्रकल्प, हळदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्प व त उपसा सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांचा पुढाकार महत्वाचा ठरला व येथील स्थानिक शेतकऱ्यांना बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध करून दिला या बद्दल गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी खासदार अशोक जी नेते यांचे जाहीर आभार मानले.
खासदार अशोकजी नेते यांनी या प्रकल्पावर जाऊन प्रत्यक्ष भेट दिली व माहिती जाणून घेतली व सिंचन प्रकल्पातील समस्त उर्वरीत कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश सबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी बोलतांना सांगितले की, चीचडोह व कोटगल ब्यारेज प्रकल्पाचे लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व तळोधी व हळदी पुराणी उपसा सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल असे या प्रसंगी सुचक वार्तालाप व्यक्त करत सांगितले.