माजी जि.प.अध्यक्षांच्या नेतृत्वात नामनिर्देशन दाखल.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी करिता आदिवासी विद्यार्थी संघटना व अजयभाऊ मित्र परिवार तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात ३ एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्यात आले होते. त्यात हमाल व्यापारी गटातून प्रमोद बिचु पेंदाम तर ग्रामपंचायत अनुसूचित जाती/जमाती गटातून राकेश किस्टाजी कुळमेथे अविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष दोघांची युती आहे.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, रवींद्रबाबा आत्राम माजी कृ.उ.बाजार समिती सभापती, अजय नैताम माजी जि.प.सदस्य, गुलाबराव सोयाम माजी सरपंच, राजू भाऊ दुर्गे ग्रा.प.सदस्य महागाव, माजी उपसरपंच बालूभाऊ बोगामी, अशोक येलमुले माजी सरपंच किस्टापूर, माजी सरपंच सुरेश सिडाम, नरेंद्र गर्गम, रविंद्र भोयर, रमेश डोके, राकेश सडमेक, प्रमोद गोडशेलवारसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.