वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पूणे :- विश्वरत्न बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त धानोरी येथिल आनंद बौद्ध विहारा तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, जयंती निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले यात मूलांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संविधान वाचन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
वर्षभरात विहारात विविध उपक्रम राबविण्यात येतात,यात प्रामुख्याने दर रविवारी मुलांसाठी संस्कार वर्ग भरविण्यात येतात, मूलांना योग्य संस्कार मिळाले, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न केले जातात, दर महिन्याला विहारात व्याख्यान आयोजित करण्यात येते. या व्याख्यानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती, त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती आपण समाजासाठी काय करु शकतो याचे मार्गदर्शन केले जाते. याही वर्षी विहारा तर्फे भव्य रॅली काढण्यात आली. या वर्षी रॅलीचे मूख्य आकर्षक ठरले ते म्हणजे महीला व मुलींचं लेझीम पथक यावेळी विहारातील सर्व उपासक, उपासीका उपस्थित होते.
यावेळी आनंद बौद्ध मंडळाचे अध्यक्ष तात्या साहेब लोंढे, वसंत शिंदे,शरद जावळे,बेंगळे, फडतरे आदि सदस्य उपस्थित होते. तसेच या रॅलीच्या बंदोबस्तासाठी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील उप तेजस्वी पवार, पोलिस नाईक, ज्ञानेश्वर पालवे, प्रियंका बेंद्रे, रितीका शर्मा, किरण झेंडे आदि पोलिस कर्मचारी उपस्थित होते,