उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हा तील प्रसिद्ध उद्योगपती सी. आर. सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली सी. आर. सांगलीकर फौंडेशन, ही संस्था सन २०१५ पासून गोरगरीब, होतकरू, गरजु विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे. सांगलीकर फौंडेशनच्या वतीने प्रशस्त अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही सुरू केले होते. आत्तापर्यंत ब-याच गरजु विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग करून घेत सरकारी नोक-या मिळवल्या आहेत.
मध्यंतरी काही अपरिहार्य कारणास्तव ही अभ्यासिका, ग्रंथालय बंद करण्यात आले होते. या दरम्यानच्या काळात अभ्यासिका, ग्रंथालय पुन्हा चालू करावी अशी विद्यार्थ्यांच्याकडुन सातत्याने मागणी होत होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांनी अभ्यासिका, ग्रंथालय चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सी.आर. सांगलीकर आदेशानुसार आज गुरुवार दिनांक 20 एप्रिल रोजी पुन्हा एकदा नव्या जोमाने सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या वेळेत ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. प्रशस्त, अभ्यासिकेचा व सुसज्ज ग्रंथालयाचा होतकरू, गरजु विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्की फायदा करून घ्यावा आणि स्वप्ने साकार करावीत असे आवाहन सी. आर.सांगलीकर फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. तरी काही माहिती पाहिजे असल्यास संपर्क – 9356568840 – 0233/2313272 या फोन नंबर वर कॉल करावा असे आव्हान केले आहे.