पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
गुन्हे शाखा युनिट २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि 19/04/2023 रोजी युनिट 2 कडील सपोनि वैशाली भोसले व स्टाफ युनिट कार्यालयात हजर असताना पो हवा 3120 रेणुसे यांना त्याचे बातमीदारमार्फत बातमी मिळाली कीं एक इसम ढोले पाटील रोड मोबास हॉटेल कंपाउंड मध्ये एक सिलेंडर मधून गॅस दुसऱ्या सिलेंडर मध्ये भरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी युनिट 2 चे प्रभारी क्रांतिकुमार पाटील सौ यांना कळविली असता त्यांनी सदरची माहिती मा वरिष्ठ अधिकारी सौ यांना कळविली असता त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सपोनि वैशाली भोसले व स्टाफ पंच असे मिळून सदर ठिकाणी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी एक इसम मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव मनोज उचाप्पा गायकवाड वय 53 वर्ष रा खाटीक गल्ली नं 3 दौंड पुणे असे असल्याचे सांगितले त्याचे ताब्यात मिळून आलेल्या प्यागो टेम्पोची पाहणी करता त्यामध्ये एकूण 09 सिलेंडर पैकी 5 घरगुती वापराचे एच पी कंपनी चे व 04 व्यवसायिक सिलेंडर, एक नोझल पाईप व एक इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण 1,26,600 /- रु चा माल मिळून आल्याने त्याचे विरुद्ध *कोरेगाव पार्क पो स्टे 62/2023 भा द वि 285,226 जीवनावश्यक वस्तू अधि कलम 3,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे सो, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो , सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री.सुनील पवार सो. Unit-2 प्रभारी वपोनि श्री. क्रांतीकुमार पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, विनोद चव्हाण ,उत्तम तारू, विजय पवार, नागनाथ राख या पथकाने केली आहे.