Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हडपसर हददीत येवुन गंभीर गुन्हा करणारे तडीपारांवर मोक्का’ “

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 21, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हडपसर हददीत येवुन गंभीर गुन्हा करणारे तडीपारांवर मोक्का’ “
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- फिर्यादी प्रदिप दिनकर देवकर, वय २२ वर्षे, रा. साडे सतरा नळी, हडपसर, पुणे व त्याचा मित्र शुभम कृष्णराव भोंडे वय २४ वर्षे रा. दुगड चाळ जेएसपीएम कॉलेज जवळ सातवनगर हांडेवाडी पुणे असे दि.२९/०३/२०२३ रोजी पहाटे ०१.३० वा. चे सुमारास सरकारी शाळा नं. ३२ जवळ, वैभव टॉकीज जवळ, हडपसर पुणे येथे चहाचे टपरीवर सिगारेट ओढण्यासाठी गेले होते. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र असे दोघे रिक्षाने घरी निघाले असता त्याची रिक्षा सरकारी ३२ नंबर शाळा हडपसर पुणे येथे आल्यावर त्यांच्या रिक्षा समोर दोन टु व्हीलरवर डबल सीट बसुन सागर घायतडक, ओम ऊर्फ पिंटु भंडारी, राजन लावंड, मेघराज शितोळे हे हातामध्ये धारधार शस्त्र घेवून, येवून त्यांनी अनिकेत घायतडकचा झालेल्या खुनाचा राग मनामध्ये धरून फिर्यादी व शुभमला रिक्षाच्या बाहेर ओढुन काढून फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण केली.

शुभमला ओम ऊर्फ पिंटू भंडारी, सागर घायतडक, राजन लावंड व मेघराज शितोळे यानी त्याच्याजवळील धारधार शस्त्राने मारहाण करून तु अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार किंवा मला ५ लाख रुपये दे आज तुला कायमचें संपवुनच टाकणार असे बोलून धारधार शस्त्राने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याठिकाणी जर कोणी ” मध्ये आले तर आम्ही कोणालाही सोडणार नाही” असे बोलून दहशत निर्माण करुना गाडयांवर पळुन गेले त्यावरुन हडपसर पो स्टे गुन्हा रजि.नं. ४९५ / २०२३ भादंवि कलम ३०७, ३४१, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह मपोका कलम ३७(१)(३) १३५,१४२ सह भाहका कलम ४ २५ अन्वये गुन्हा रजिस्टरी नोंद असुन गुन्हा पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डांगे, यांचेकडे देण्यात आलेला आहे. त्यानंतर उपचारा दरम्यान जखमी इसम मयत झालेने दाखल गुन्हयात भा.द.वि. कलम ३०२ अन्वये कलमवाढ करणेत आली आहे.

दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान निष्पन्न व अटक आरोपी नामे (1) राजन रघुनाथ लावंड, वय २१ वर्षे, रा. सर्व्हे नं. १६५. नवीन यश हॉस्पीटल जवळ, माळवाडी, हडपसर, पुणे, (टोळी प्रमुख) (२) ओम ऊर्फ पिंटु विनोद भंडारी, वय-२२ वर्षे, रा. सर्व्हे नं. १६५. काळुबाई मंदीराजवळ, माळवाडी, हडपसर, पुणे (टोळी सदस्य) (3) ऋषिकेश ऊर्फ मेघराज प्रविण शितोळे, वय १९ वर्षे, रा. सव्र्व्हे नं. १६५, भैरवनाथ चौक, माळवाडी, हडपसर, पुणे, (टोळी सदस्य) (४) रोशन हनुमंत सोनकांबळे वय २१ वर्षे रा. सध्या रा. तुपेनगर मांजरी फार्म मांजरी पुणे व स.नं. १६५ बंधा रुपया चौक, माळवडी, हडपसर पुणे (टोळी सदस्य) (५) सागर शिवाजी घायतडक, वय १९ वर्षे रा. शिवसेना चौक, माळवाडी हडपसर पुणे (टोळी सदस्य ) या आरोपींनी दाखल गुन्हा हा हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वतःचे व स्वतःच्या टोळीचे वर्चस्व / दहशत रहावी म्हणुन व स्वतःच्या व इतरांसाठी गैरवाजवी अवैध मार्गाने आर्थिक फायदा इतर फायदा मिळविण्यासाठी तसेच नागरीकांच्या मनात भिती निर्माण करण्याकरीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न होत झाले.त्यांचे विरुद्ध दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे फलम ३ (१) (i), ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणेची महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ कलम- २३ (१) (अ) प्रमाणे पुर्वमान्यता मिळणेकामी प्रस्ताव हडपसर पो स्टे कडुन मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पूर्व मंजुरी मिळणे बाबत मा. अपर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला होता. त्यावर मा. कार्यालयाकडून दि.२०/०४/२०२३ अन्वये सदर गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम
सन १९९९ चे कलम २३(१) (अ) प्रमाणे मंजूरी देणेत आलेली असुन वरील गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (i), ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणेत आला
असुन

पुढील तपास श्री बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर हे करीत आहेत.यातील सराईत गुन्हेगार राजन रघुनाथ लावंड, ओम ऊर्फ पिंटु विनोद मडारी, सागर शिवाजी घायतडक हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापूर्वी पुणे शहरातील वानवडी, हडपसर, येरवडा पोलीस स्टेशन अशा वेगवेगळया पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.

१) राजन रघुनाथ लावंड याचेवर अपहरण, दुखापत, खुनाचा प्रयत्न असे एकुण ०८ गुन्हे- २) ओम विनोद भंडारी याचेवर दरोडा, गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न विनयभंग असे एकुण १० गुन्हे (३) सागर शिवाजी घायतडक याचेवर खुनाचे प्रयत्नाचे एकुण ०२ गुन्हे असे गुन्हे दाखल आहेत.राजन रघुनाथ लावंड, ओम ऊर्फ पिंटु विनोद भंडारी यांना मा. पोलीस उप- आयुक्त, परीमंडळ ५ पुणे शहर यांनी ०२ वर्षाकरीता तडीपार केले आहे.

मा. श्री. रितेशकुमार पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कार्यभार घेतलेनंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्हयांत कठोर व कडक कारवाई करणेबाबत व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

श्री. रंजनकुमार शर्मा सो अपर पोलीस आयुक्त सो. पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-५ पुणे शहर श्री बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, त्यांचे मार्गर्शनाखाली श्री. अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विश्वास डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे). सहा. पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक संतोष डांगे, हडपसर निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रविण शिंदे, गिरीश एकोर्गे, महेश उबाळे, राकेश चव्हाण, मोना खैरे, गुन्हे शोध पथकातील प्रशांत दुधाळ, निखील पवार, शाहिद शेख, अमोल दणके सर्व हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कारवाई केली आहे.

Previous Post

गडचिरोली शहरातील अनेक तरुणांचा वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश.

Next Post

जिंजगाव येथे पार पडली शासकीय योजनांची जत्रा, शासनाने पुढाकार घेतला आता जनतेने पुढे येण्याची गरज: भाग्यश्रीताई आत्राम

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जिंजगाव येथे पार पडली शासकीय योजनांची जत्रा, शासनाने पुढाकार घेतला आता जनतेने पुढे येण्याची गरज: भाग्यश्रीताई आत्राम

जिंजगाव येथे पार पडली शासकीय योजनांची जत्रा, शासनाने पुढाकार घेतला आता जनतेने पुढे येण्याची गरज: भाग्यश्रीताई आत्राम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In