निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ताडाळी:- भीम ज्योती मूळनिवासी ग्राम प्रबोधन सप्ताह महोत्सव सुराज्य जनजागृती समिती आणि गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत ताडाळी येथे राबविण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या विविध पुरस्काराने सन्मानित सप्तखांजेरी निर्माते राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे भव्य जाहीर प्रबोधन ताडाळी गावात पार पडले. सत्यपाल महाराजांनी कीर्तनात विविध सामाजिक गाव समाज जनजागृती विषयावर कीर्तनातून प्रबोधन केले. की बुद्धीचा वापर करा, ग्रामगीता वाचा, त्यातून कळेल ग्रामसभेचे महत्त्व आणि बुवा बाबाच्या नादी लागून अंधश्रद्धेला बळी पडू नका, सत्य मार्गाने चला आणि व्यसनाच्या आहारी पडू नका. दारूच्या आहारी गेल्याने लोकांच्या घरात अंधार पसरतो आणि दारूमुळे कित्येक लोकांची जीव जातात त्यासाठी प्रत्येक गाव दारू मुक्त झालं पाहिजे. जाती धर्म पंथ सर्व भेदाभेद विसरून मानवता हा धर्म पाळावा. कुणाचे ही डोक्याने व शरीराने गुलाम बनू नका. असा आपला कीर्तनाच्या माध्यमातून सत्यपाल महाराजांनी व लोक प्रबोधन केले.
या कार्यक्रमासाठी विविध गावातून बहुसंख्या लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर, अखिल भारतीय सरपंच परिषद विदर्भ अध्यक्ष ॲड.देवा पाचभाई आणि स्वप्निल उरकुडे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रचार प्रसार व संचालन विश्वास घडसे यांनी केले.यावेळी गावातील होतकरू उच्च शिक्षण घेत असलेले पाहिले स्वच्छतादूत प्रशिक मेश्राम, कुणाल वंजारी, विश्वास घडसे, अक्षय एकोनकर, सौरभ देशकर, प्रणय मेश्राम, आयुष वासेकर तसेच गावातील प्रबोधन व गाव उन्नतीस कार्य करणारे शिवदास शेंडे, मेघराज केळवतकर, सुरेश धांडे, नथुजी गोहने, संतोष झाडे यांचा सत्यपाल महाराज हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम आयोजन ताडाळी गावचे उपसरपंच निकीलेश बेबी रमेश चामरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे ताडाळी ग्रामपंचायत सदस्य बबन कासवटे ,अशोक मडावी, अनिता उगे, कविता निखाडे, तंटामुक्ती सदस्य शिवदास शेंडे, शाळा व्यवस्थापन सदस्य प्रवीण पाल, वणमला पेंदोर, गावकरी सामाजिक कार्य प्रेरक संदीप चिवंडे, प्रमोद कासवटे, मेघराज केळवतकर, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष संतोष झाडे, सचिव नत्थू गोहणे आणि सर्व सदस्य, वैशाली वाघमारे ,आकाश चिवडे, विश्वास घडसे, प्रणय मेश्राम, अमोल मडावी, विकास सूरकर, अक्षय तलमले, साहिल धोंगडे, अनुष्री पाटील, अनुष्का लाडे, बेबी चामरे, सोनाली उजवणे, चित्रा वासेकर, शुभांगी चारथळ, भाग्यश्री पाल, सुमन केळवतकर, प्रीती आवळे, सुदर्शना बुच्चे, सपना पेटकर सर्वांनी मोलाचे परीश्रम घेतले.