पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरून लपूनछपून होणारी गावठी हातभट्टी विक्री, साठवणूक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध हावा करीता मा पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो यांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे सोव मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-म श्री पदमाकर घनवट सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रतिश पवार, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले होते.
त्याप्रमाणे दि. १९/०४/२०२३ रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस हवालदार प्रदीप शेलार, पोलीस शिपाई- मितेश यादव यांना मिळालेल्या बातमीवरून शिरगाव ता. मावळ जि. पुणे येथे पवना नदीच्या कडेला छापा टाकून दोन गावठी हातभट्टीची चालू करण्याची तयार भट्टी व मातीच्या टाकी सारखे तीन मोठे खड्डे तयार करून त्यामध्ये ताडपत्री ठेवलीली ५००० लिटर मापाचे दोन व १०००० मापाचा एक खड्डा त्या खड्ड्यांमध्ये गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे २०,००० लिटर रसायन (कच्चा माल ) असा एकुण १०,००,०००/-रु. किं.चा प्रोव्हिबिशन माल अनाधिकाराने बेकायदेशिररित्या गावठी दारू तयार करण्यासाठी ठेवलेला मिळुन आला. तसेच एकूण १०,५००/- ०. कि.ची ३५ लिटर मापाचे गावठी हातभट्टी तयार दारुचे भरलेले तीन कॅन मिळून आले ते जप्त करण्यात आले आहे सदरच्या भट्या ह्या हि महिला ज्योती ईश्वर राजपूत रा. कंजारभटवस्ती गहुजे रोड मु.पो. शिरगाव ता. मावळ जि. पुणे व महिला नामे आश्विनी राहुल मनावत वय ३० वर्षे रा. कंजारभटवस्ती गहुंजे रोड मु.पो. शिरगाव ता. मावळ जि.पुणे यांची असल्याची माहीती मिळाल्याने तिचे विरुद्ध शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत टि.जी. एच. डोळयाचे हॉस्पिटल समोर आडोशाला इसम नामे प्रशांत अरुण दुबे, याचे जन्यातुन एकुण ५,३००/- रुपये किंमतीची गावठी हातभट्टीचा तयार दाराचा प्रौकि माल जास्त करून सदर इरामाविरुष्य बळेगाव सरमाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे
वरील कारवाईमध्ये एकूण २०,००० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन व १५८ लिटर गावठी हातभट्टी तयार दारु व दारुच्या भट्टी साठी लागणारे भांडे असा एकूण १०,१५,८००/- रु. किं.चा प्रोव्हिबिशन माल जप्त केला आहे.तसेच पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस नाईक विजय पौडकर व प्रसाद फलाटे यांना मिळालेल्या बातमीवरून इसम नामे अदित्य राम सुर्वे, वय १९ वर्ष रा पिपरी भाजी मंडई जवळ, युगंधर चौक, पिंपरी पुणे यास ताब्यात घेवुन अधिक चौकशी
केली असता त्याने पिंपरी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ४६० / २०२३ भारतीय दंड विधान कलम ३७९ या गुन्हयातील मोबाईल चोरी केल्याचे कबुल करून त्यावेकडुन गुन्हयामध्ये चोरीस गेलेला १०,०००/- रु. किंवा मोबाईल जप्त करून सदर गुन्हा उघडकीस केला आहे. सदर आरोपीस पुढील कार्यवाहीकामी पिंपरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे. तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे हदीतील भाटनगर पिंपरी येथे गांजा ताब्यात बाळगुन गांजा सेवन करणाऱ्या नुरजितसिंग उर्फ सनी गुलजारसिंग विरदी र मिलिंदनगर पिंपरी पुणे यास ताब्यात घेवुन त्याचे विरुद्ध एन. डी. पी. एस अॅक्ट कलम ८(क) २७ प्रमाणे पिंपरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे सो मा. सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. पदमाकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतिश पवार, पोउपनि श्री ज्ञानेश्वर दळवी, पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक व पोलीस अमलदार सहा. पोलीस फौजदार बाळासाहेब सूर्यवंशी, जिलानी मोमीन, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, राजेंद्र बावळे, दिनकर भुजबळ, पोलीस नाईक मनोज राठोड, मयुर वाडकर, संतोष भालेराव, विजय दौलकर प्रसाद कलाटे, अजित कुटे, पोलीस शिपाई रणधीर माने, मितेश यादव, सदानंद रूद्राक्षे, अशोक गारगोटे, कपिलेश इगवे यांनी केली आहे.