पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
दत्तवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- गरजेच्या वेळी त्याने गळ्यातील सोन्याची चैन देऊन ती गहाण ठेवायला सांगून मदत केली. पण मदतीची जाणीव न ठेवता त्याने पैसे परत केले नाही. उलट तो पळून गेला. तेव्हा त्याने त्याची बहिण, आईवडिल यांचे अपहरण करु डांबुन ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी येथे राहणाऱ्या एका २९ वर्षाच्या महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ११६/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुणाल रावळ, पांचाळ, कुणाल रावळ याची पत्नी व त्यांचा साथीदार अशा चौघांवर अपरहणाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सारसबाग ते नांदेड सिटीजवळील फ्लॅटमध्ये १६ ते २० एप्रिल दरम्यान घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा भाऊ संकेत टकले याला पैशांची गरज होती. तेव्हा कुणाल रावळ याने स्वत:च्या गळ्यातील सोन्याची चैन देऊन ती गहाण ठेवून पैसे घेण्यास सांगितले. संकेत याने ही चैन घेतली. मात्र, त्यानंतर त्याने ती चैन सोडवून आणली नाही. त्याच्या व्याजाचे पैसेही दिले नाही.
कुणाल रावळ याने वारंवार मागणी केल्यानंतरही तो पैसे देत नव्हता. त्याचे आईवडिल, बहिण यांना सांगूनही तो पैसे परत करत नव्हता. त्यानंतर तो गायब झाला. १६ एप्रिल रोजी कुणाल याने पुन्हा पैशांची मागणी केली. संकेत याचा पत्ताही देत नव्हते. त्यामुळे त्याने फिर्यादी, तिचा पती व तिचे आईवडिल यांना जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना नांदेड सिटी येथील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवले. चार दिवस डांबून ठेवल्यानंतर २० एप्रिल रोजी रात्री दहा वाजता त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
सहायक पोलीस निरीक्षक युवराज तपास करीत आहेत. पाटील