मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- रमजान ईदचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतिने मुस्लिम बांधवांकरीता चंद्रपूर रोडवरील गुलाम ए मुस्तफा सभागृहात ईफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील मस्जिदीतील रोजा धरणारे सर्व मुस्लिम बांधव एकवटले होते.
या ईफ्तार पार्टीच्या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मौलाना जहांगीर आलम, हाफीज शेख, फिरोज जमशेदखॉ पठाण, फिरोज हबीबखॉ पठाण, अयुब शेख, मोहम्मद बशिर शेख, रहिम शेख, ईजानूल शेख, अर्शद खान, आरिफ कनौजे, बबली पठाण, वंचितचे उपाध्यक्ष जी के बारसिंगे, तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, युवा नेते चंदू नैताम आदि उपस्थित होते.
यावेळी वंचितच्या पदाधिका-यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थित सर्व मुस्लिम बांधवाचे स्वागत केले व नंतर ईफ्तार पार्टीला सुरूवात करण्यात आली.
यावेळी बोलतांना मौलाना जहांगीर आलम म्हणाले की, शहरात ईफ्तार पार्टीचा आयोजन करणारी वंचित बहुजन आघाडी हा पहिलाच पक्ष असून भाईचारा, ईंसानियत व सलोखा कायम ठेवण्यासाठी वंचितने पुढाकार घेतल्याने म:नस्वी आनंद व्यक्त केला. या ईफ्तार पार्टिच्या यशस्विते करीता महिला नेत्या मालाताई भजगवळी, संगिता बोदेले, सुरज खोब्रागडे, भारत रायपूरे, मनोहर कुळमेथे, जावेद शेख, भोजराज रामटेके, किरण हजारे, गोविंदा शेंडे, रवी निकोडे, पंकज कोकोडे, सागर मोहुर्ले आदिंनी अथक परिश्रम घेतले.