सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात शुक्रवारी आलेल्या अवकाळी पाऊस आणि सुसाट वाऱ्याने एका परिवाराचे राहत घर उध्वस्त केल आहे. घरासमोर असलेले आयडिया कंपनीचे मोबाईल नेटवर्कचे 121 फूट उंच असलेला टाॅवर घरावर कोसळला. ही घटना वडगाव प्रभागातील गायत्रीनगर येथे घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी टॉवर घरावर कोसळल्याने घरमालक श्रीनाथ चुंद्री यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वडगाव प्रभागातील गायत्रीनगर येथे 121 फूट उंच आयडिया कंपनीचा टॉवर बसविला होता. या टॉवरशेजारीच चुंद्री यांचे घर आहे. शुक्रवारी सकाळपासून चंद्रपुरात उन्हाचा पारा वाढला होता. परंतु, सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शहरातील वातावरणात अचानक बदल झाला. त्यानंतर काही वेळाने सुसाट वादळ सुटले. आभाळ दाटून आले, विद्युत पुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी पाऊसही कोसळला. दरम्यान, गायत्रीनगरातील आयडिया कंपनीचा 121 फूट उंच असलेला टॉवर श्रीनाथ चुंद्री यांच्या घरावर कोसळला. घरी सर्वजण होते. परंतु, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, चुंद्री यांचे मोठे नुकसान झाले.