डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईगन पिंपरी:- हातात लोखंडी कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या 4 जणांच्या टोळीच्या रावेत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. ही घटना रावेत मधील शौर्य लॉज येथे शनिवारी (ता.२२)रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
१) अमित गजानन वानरे वय ३२ वर्ष, रा.शिवशंभू कॉलनी ,आदर्श नगर देहूरोड ,२)विशाल बाळू वाजे वय-२२, वर्षे ,रा.राजगड कॉलनी, गॅस गोडाऊन च्या मागे, अदर्शनगर देहूरोड ३)साजन मधुकर खेडेकर वय ३० वर्ष, रा. शिवशंभो कॉलनी ,अदर्श नगर देहूरोड ४)राज संतोष कांबळे वय२१, वर्ष रा.पुरंदर कॉलनी मुकाई चौक, किवळे असे अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लॉज मॅनेजर सत्यरंजन सुरेंद्र लिंका वय ४३ वर्ष, सध्या रा. शौर्य लॉज, रावेत ता. हवेली, जि.पुणे ,मुळगाव ओडिसा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे शनिवारी शौर्य लॉज मॅनेजर सत्यारंजन लिंका आहे लॉजच्या काउंटर वर बसले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगाची अल्टो ८००कार व एक हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी त्यांच्या लॉजमोर थांबली .आणि गाडीतील इसम लॉज मध्ये घुसले. त्यांनी काउंटरवर बसलेली मॅनेजर सत्यारंजन लिंका यांना हातातील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवत त्यांना हाताने व लाकडी काठीने मारहाण केली .तसेच लॉज च्या गल्ल्यातील ०७हजार रुपयांचे रोकड बळजबरीने चोरून पळून गेले.
या प्रकरणाचा तपास रावेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव हे करीत असताना त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. इसमांनी वर्णन माहितीवरून त्यांचा शोध सुरू केला .हे आदर्शनगर देहूरोड च्या दिशेने पळून गेले असल्याची माहिती सहाय्य पोलीस निरीक्षक विशाल जाधव यांना मिळाली होती .त्या अनुषंगाने पाठलाग करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या टोळीला रावेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रावण टोळी नंतर….व्ही .के .साम्राज्य?
पिंपरी चिंचवड शहरात निर्माण करणाऱ्या रावेत मधील रावण टोळीचा पोलिसांनी खातमा केल्यानंतर आता शहरात व्ही. के. (विशाल खेडेकर) साम्राज्य नावाची टोळी सक्रिय होत असलेली माहिती सूत्रांकडून मिळत आहे .या टोळीची लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी. याकरिता त्यांनी रावेत येथील शौर्य लॉजवर दिवसाढवळ्या हल्ला केला असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे .पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैद्य प्रकारांना लगाम बसला आहे .पोलिसांनी अवैद्य प्रकारावर कारवाईचा बडगा उभारला आहे .रावण टोळीनंतर व्ही .के.साम्राज्य नावाची टोळी स्वतःचे साम्राज्य पसरण्यासाठी जर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा टोळीचा पोलीस आयुक्तांनी वेळी बंदोबस्त केला पाहिजे.अशी टोळीचा आता नागरिकांकडून केली जात आहे.