संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- अकोला जिल्ह्याच्या मूर्तीजापुर मधील नागसेन नगर बुद्ध विहारातील भिक्खुनी खेमा थेरी यांच्या मार्गदर्शनात श्रामनेरी झालेल्या बाल श्रामनेरांनी काल दुपारच्या सुमारास नागपुर येथील पवित्र दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट दिली. यात 6 वर्षापासून तर 10 वर्षाच्या श्रामनेरी पर्यंतच्या श्रामणेरांचा सहभाग होता. शाळेला सुट्ट्या लागल्याने या सुट्टीच्या काळात बालकांनी भिक्षू जीवन व त्यांचे आचार विचार कसे असतात हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी श्रामनेरांची दीक्षा घेतली. या बाल श्रमनेरांनी नागपुरातील बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध धम्माशी संबंधित प्रेरणा स्थळांच्या भेटी देण्याचे त्यांनी निश्चित केलेले आहे.
तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समत्र मानवजातीच्या कल्याणासाठी मोलाचा विचार पेरला तो विचार प्रत्येक बालकांना समजावा उमजावा प्रत्येक बाल मनावर योग्य संस्कार व्हावे म्हणून मागील अनेक वर्षांपासून भिक्खुनी खेमा थेरी यांच्या मार्गदर्शनात श्रामनेर शिबिर आयोजित करण्यात येते.
या शिबिरात श्रामणेरांची नावे सुद्धा बुद्ध काळातील उत्पलवरणा, विशाखा, सुजाता, कुंडलकेसा, सुकेशनी, सुप्रिया व राहुल अशाप्रकारे देण्यात आली. यावेळी बसपा नेते उत्तम शेवडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.