रूपसेन उमरानी, मुंबई ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जत:- महात्मा जगतजोती बसवेश्वर महाराज जयंती निमित्त आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथील बसवेश्वर महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी दिलीप सोलापुरे सावकार, शिवकुमार तंगडी, राजू जेऊर बाळासाहेब तंगडी, शिवा गुजरे, तुकाराम माळी, राजू कोरे, डॉ. पट्टनशेट्टी,राघवेंद्र तंगडी,पापा कुंभार, राजेंद्र अरळी आणि सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत बसवेश्वर महाराज यांची “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. (बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते. सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनूभव मंटपाच्या माध्यमातून केल्याचे वचनसाहित्यातून दिसून येते.एकूणच त्यांनी वचन साहित्यात समता, मूल्य, न्याय, बंधूता, एकात्मता तसेच स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण व शिस्त, सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल विवेचन केले आहेत. सद्यस्थितीत शासन व प्रशासनाला या विचारांचा अवलंब केल्यास निश्चितच देशात निर्माण होणारी विषमता, हिंसा, भेदभाव व जातीय राजकारण इ. समस्यावर (पायबंद) आळा घालता येईल. परिणामतः चांगले सुशासन व प्रशासन व्यवस्था निर्माण होइल.