उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौध्द धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार, सांगलीच्या वतीने भगवान बुध्द यांच्या जयंती निमित्त भव्य चित्रकला स्पर्धाचे आयोजन श्रावस्ती बिहार सि.स.नं. २२३ / अ-२, प्लॉट नं. १७ महात्मा फुले रोड, (१०० फुटी), चिन्मय पार्क समोर, सांगली येथे दि. ३० एप्रिल २०१३ रोजी वेळ सकाळी ९.३० ते १२.०० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत शहरातील या स्पर्धेत शहरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही सहभाग घेऊ शकतो. ही स्पर्धा वेगवेगळ्या 4 गटात आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा निःशुल्क असून, यात निसर्ग चित्र, विदुषक, कोणतेही कार्टून, पतंग उडविणारी मुले, माझे आवडते फळ किंवा फुल, निसर्ग चित्र- सुर्योदय, स्मरण चित्र, वृक्षारोपण, पावसात खेळणारी मुले, व्यक्ती चित्र, सावित्रीमाई फुले, शाहू महाराज निसर्ग चित्र, समुद्र किनारा, सुर्यास्त, व्यक्ती चित्र, तथागत गौतम बुध्द, क्रांतीबा जोतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुध्द यांच्या जीवनावर आधारीत चित्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग, महिलांचे स्व स्वरक्षण यांचे चित्र असे विषय देण्यात आले आहेत. चित्रकलेसाठी लागणारा पेपर हा आयोजकांकडून पुरवला जाईल, मात्र रंग हे स्पर्धकांनी स्वतः वापरायचे असून, पाठवलेल्या चित्रांपैकी पहिल्या तीन क्रमांकांना वेगवेगळ्या गटांना वेगवेगळे पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.
आयोजित या चित्रकला स्पर्धेसाठी संपर्क सुनिता धम्मकिर्ती मो. ८७६६९१६००४, पवन रमेश वाघमारे, मो. ८१४९२२१२३२, दिपमाला कांबळे ९४२११८७३८७, शैलजा साबळे ९८२२३१७३८६, चंद्रकांत नागवंशी मो. ८९९९८९८१०८, विकास भिसे मो. ७५०७३१५९२८