रूपसेन उमरणी, मुंबई ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- राज्यात शेतकऱ्यानंसाठी महत्वपूर्ण असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे महविकास आघाडी तर्फे ही निवडणूक प्रचाराला जोरदार वेग आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी विकास पॅनलची प्रचार सभा दरीकोनुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या सभेसाठी माजी मंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश काका पाटील, विक्रमसिंह सावंत, सुरेश पाटील, सुरेश शिंदे सरकार, जिल्हा बँक संचालक सरदार पाटील, मा. जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटिल, सर्व उमेदवार, ग्रामपंचायत आणि सोसायटी गटातील मतदार, नसर्व मान्यवर नेते उपस्थित होते.

