वैदकिय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची परिस्थिती न बदल्यास आंदोलनाचा इशारा.
सौ.हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- तालुक्यातील विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक दिवसापासून रुग्णांना औषध देण्यात येत नसल्याची अनेक रुग्णाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक गरीब रुग्णांना मोफत औषधे न मिळाल्याने नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. याची दखल घेत. रुग्णाच्या सोयी प्रमाणे औषधसाठा उपलब्ध करून द्या अशी मागणी संदीप पोडे यांनी केली वैदकिय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे. वैदकिय अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची परिस्थिती न बदल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
सुधीर मुनगंटीवार मस्त्य व्यवसाय, वने व संस्ककृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य, देवराव दादा भोंगळे, अजय भय्या दुबे, किशोर पंदिलवार, आशिष देवतळे, मिथिलेश पांडे यांचा मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्रात गोळ्या व औषधी रुग्णांचा सोयी नुसार उपलब्ध करून देण्याकरिता विसापूर संदीप श्रीहरी पोडे यांनी वैद्यकीय अधिकारी यांना निवेदना मार्फत मागणी व आंदोलनाचा इशारा प्राथमिक आरोग्य केंद्रा अनंतर्गत विसापूर व अजून काही गावंची जिम्मेदारी विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेली आहे. हे आपणाला माहिती आहे. त्या मध्ये विसापूर हा गाव जास्त लोकसंखेचे गाव आहे. व नागरिकांना गोळ्या व औषधी मिळणे हा येणाऱ्या रुग्णाचा अधिकार असतो परंतु विसापूर पीएचसी ला आपण बघत असतो. अतिदक्ष (अपघात, साप चावणे) रुग्ण जेव्हा विसापूर पीएचसी ला येतो तेव्हा आरोग्य केंद्रात डॉक्टर्स उपस्थित राहत नही व प्राथमिक चिकिस्त उपचार होत नाही. काही रुग्णांना औषधी नाही म्हणून सांगितल्या जाते व वरून औषधी साठा उपलब्ध झालेला नाही या प्रकारचा कारण देत असतात. या कारणांमुळे रुग्णाचा जीवांचा धोका निर्माण झालेला दिसतो. हि वैद्यकीय आरोग्य अधिकऱ्या ने स्वतः आपली जिम्मेदारी घेऊन हि परिस्थिती जर का बदलीविले नाही तर आम्हला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल या प्रकारच निवेदन संदीप श्रीहरी पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) यांनी विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकार्यांना दिलेलं आहे. वैध्यकीय अधिकाऱ्यांनी देखील लवकर औषधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिलेले आहे.

