डॅनियल अँथनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:- चाकण येथील एक संतापजनक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिला म्हणून तिच्या दीड वर्षाच्या मुलाचा एका इसमाने कायमचा काटा काढला आहे. सकाळच्या वेळी बाथरूम मधील उकळत्या गरम गरम पाण्याच्या बकेटमध्ये त्या बालकाला खालीवर बुडवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन फरार झाला. मात्र गुन्हे शाखा युनिट -३पथकाने या निर्दयी इसमाचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.
ही संतापजनक घटना चाकण येथील शेल पिंपळगाव येथे गुरुवार ता. ६ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी घडली होती. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विक्रम शरद कोळेकर रा. कोयाळी ता. खेड जि. पुणे असे अटक केलेल्या या निर्दयी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी बाळाच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण पोलीस स्टेशनमध्ये रविवार ता.२३ रोजी एका दीड वर्षाच्या बालकाचा खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. मलग्नास नकार दिल्याच्या कारणा वरून या अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार यादरम्यान या बाळाचा मंगळवारी (ता.२८)रोजी मृत्यू झाला आहे.या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट -३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड आणि सटाफ यांनी युद्ध पातळीवर सुरू केला. आरोपीला पकडण्यासाठी दोन वेगवेगळे टीम तयार करण्यात आले.
एका टीम मध्ये स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी सोबत पोलीस नाईक भालचिम, पोलीस नाईक दांगट, मेरगळ, नांगरे यांच्यासह आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी विक्रम कोळेकर राहत असलेल्या कोयाळी परिसरात त्याचा शोध घेत असता दुसऱ्या टीम मधील पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, हवालदार आढारी, शिपाई कोळेकर फापाळे ,काळे हे बहुळ चाकण परिसरात आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या टीमला माहिती मिळाली की सदर आरोपी हा बहुळ परिसरात येणार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दुसरी टीम ही बहुळ परिसरातजवळच असल्याने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्याबाबत योग्य सूचना देण्यात आल्या.
मिळालेल्या मिळालेली माहिती व सूचनाच्या अनुषंगाने दुसऱ्या टीमने सापळा रचून सिताफिने आरोपी विक्रम कोळेकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी असतात त्याने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. पुढील कारवाई करिता आरोपी विक्रम कोळेकर याला चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स स्वप्ना गोरे ,साहयक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले ,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटी -३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, महेश भालचिम, ऋषिकेश भोसरे, योगेश कोळेकर, सागर जैनक, शशिकांत नांगरे, त्रिनयन, बाळसराफ, दांगट, समीर काळे, निखिल फापळे, रामदास मेरगळ, राजकुमार हनुमंते, राहुल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.