पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
सायबर पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ११/०८/२०१८ रोजी पुणे येथील कॉसमॉस बँकेच्या कॉसमॉस टॉवर गणेश खिंड रोड पुणे या मुख्यालयात असलेल्या ए.टी.एम. स्विच (सर्व्हर) वर सायबर हल्ला करून कॉसमॉस बँकेची एकूण २४.४२,००,०००/- रुपयांची फसवणुक झाली होती. त्यामध्ये बँकेच्या काही व्हीसा व रुपे डेबीट कार्ड धारकांची माहिती चोरून, क्लोन व्हिसा डेबिट कार्डव्दारे प्रत्यक्ष ए.टी.एम. सेंटरवर जावुन क्लोन कार्डद्वारे भारताबाहेर एकुण रक्कम रु.19८,००,००,०००/- ची व भारतामध्ये क्लोन रूपे डेबिट कार्ड द्वारे २८४९ व्यवहार करुन अंदाजे रक्कम रु.२,५०,००,०००/- ची फसवणुक केली गेली होती.तसेच दि. १३/०८/२०१८ रोजी सकाळी ११.३० वा. स्विफ्ट ट्रान्झॅक्शन इनिशिएट करुन हँगसँग बँक, हॉंगकॉंग या बँकेच्या ए.एल.एम. ट्रेडींग लिमीटेड हॉगकॉग यांच्या बँक खात्यावर एकुण १३ कोटी ९२ लक्ष रुपये जमा करून ते काढून घेतले गेले होते. अशाप्रकारे एकुण रु. ९४,४२,००,०००/- (९४ कोटी ४२ लक्ष रु.) स्वतःच्या व इतर आरोपींचे आर्थिक गैरफायद्याकरीता व बँकेला आर्थिक नुकसान होण्याच्या उद्देशाने बँकेच्या सुरक्षा सिस्टीममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करून बँकेची व बँकेच्या ग्राहकांची गोपनिय माहीती चोरुन बँकेची फसवणुक केली म्हणुन चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६६ / २०१८ भारतीय दंड विधान संहिता कलम १२० ( ब ). ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४००१३४ सह माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ४३ (ए) (बी) (सी) (ई) (जी)(आय) ६५, ६६.६६ (सी) . ६६ (डी), ८४(बी) ८५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचा तपास जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आला होता तपासा दरम्यान सायबर पोलीस स्टेशनने एन.पी.सी. आय. व्हिजा व बँकेकडुन प्राप्त माहितीचे तांत्रीक विश्लेषण केले असता जास्त रक्कमा ह्या भारतातील कोल्हापुर मुंबई, अजमेर व इंदौर या ठिकाणावरुन काढल्याचे दिसुन आले. सदर ठिकाणी वेगवेगळी पोलीस पथके पाठवुन तांत्रीक माहिती गोळा करण्यात आली. सदर माहितीच्या विश्लेषणावरून कोल्हापुर, अजमेर, इंदौर व मुंबई येथील टोळ्यांमधील एकुण १८ आरोपींना सन २०१८ २०१९ मध्ये अटक करण्यात जाली होती. तपासादरम्यान प्राप्त झालेले सी.सी.टी.व्ही. फुटेज व इतर तांत्रिक पुराव्या आधारे त्यांचे विरुद्ध सबळ दोषारोपपत्र मा न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते अटक आरोपी पैकी एक आरोपी गयत झाला असून १७ आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडी रिमांड मध्ये आहेत.
मा.न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी कोर्ट नं.४, पुणे यांनी दि. १५/०४/२०२३ रोजी दाखल गुन्यातील अटक केलेल्या १८ आरोपींपैकी खालील ११ आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. १) फहिम गेहफुज शेख रा.बी नगर, भिवंडी, ठाणे. २) फहिम अझींग खान रा. आझादनगर, सिल्लोड, औरंगाबाद… ३) शेख मोहम्मद अब्दुल जब्बार रा. सिल्लोड, औरंगाबाद, ४) महेश साहेबराव राठोड रा. ता. भोकर जि… नांदेड, ५) नरेश लक्ष्मीनारायण महाराणा रा. विरार ईस्ट, जिल्हा- पालघर, ६) मोहम्मद सईद इक्बाल हुसेन जाफरी उर्फ अली रा. हमालवाडा, दर्गा रोड, भिवंडी, ७) युस्टेस अगस्टीन वाझ ऊर्फ अँथोनी रा.मजाद, जोगेश्वरी ईस्ट, मुंबई, ८) अब्दुल्ला अफसरअली शेख रा. कनकेया मिरी रोड इस्ट अणे, ९) बशीर अहमद अब्दुल अझीज शेख,रा भायखळा मुंबई, १०) सलमान मोहम्मद नईम बेग राजनवर नगर कौसा, मुंबा, ठाणे. ११) फिरोज यासीन शेख, रा. काळा चौकी, कॉटन ग्रीन मुंबई.यातील आरोपी क्रमांक १ ते ७ यांना भा.दं.वि. कलम ४२० अन्वये ४ वर्ष साधी कैद, रु. २०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद, भा.दं.वि. कलम ४६७, ४६८, ४७१ अन्वये ४ वर्ष ७ महिने साधी कैद, रु २०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद भा.दं.वि. कलम ४६९ अन्वये ३ वर्ष साधी कैद, रु. १०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कद, भा.दं.वि. कलम १२० व अन्वये ६ महिने कारावास, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी) अन्वये ३ वर्ष साधी कैद, रु.१०० दंड दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अन्वये ३ वर्ष साधी कैद, रु.१०० दंड दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद.यातील आरोपी क्रमांक ८ व ९ यांना भा.दं.वि. कलम ४२० अन्वये ४ वर्ष साधी कैद, रु.२०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद. भा. दं.वि. कलम ४६७, ४६८, ४७१ अन्वये ४ वर्ष साधी कैद, रु. २००. दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद, भा.दं.वि. कलम ४६९ अन्वये ४ वर्ष साधी कैद, रु १०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद, भा.दं.वि. कलम १२० ब अन्वये ६ महिने कारावास माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी) अन्वये ३ वर्ष साधी कैद, रु.१०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अन्वये ३ वर्ष साधी कैद, रु.१०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद.यातील आरोपी क्रमांक १० व ११ यांना भा.दं.वि. कलम ४२० अन्वये ३ वर्ष साधी कैद, रु. २०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद भा.दं.वि. कलम ४६७, ४६८, ४७१ अन्वये ३ वर्ष साधी कैद रु २०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद भा.दं.वि. कलम ४६९ अन्वये ३ वर्ष ५ महिने साधी कैद रु. १०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद भा.दं.वि. कलम १२० ब अन्वये ६ महिने कारावास, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी) अन्वये ३ वर्ष साधी कैद, रु १०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अन्वये ३ वर्ष साधी कैद, रु १०० दंड, दंड न भरल्यास ३ दिवसांची कैद वरील सर्व शिक्षा समवर्तीपणे चालू रहातील.
दाखल गुन्ह्याचे तपास तात्कालीन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर मा. सह पोलीस आयुक्त, पुणे शहर गा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे श्री. देशपांडे, मा. पोलीस उप-आयुक्त ( आर्थीक व सायबर) श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त (आर्थीक व सायबर) श्री. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केला असुन दाखल गुन्ह्यात लेखनिक म्हणून पोहवा अजित कुम्हे, पो.शि. योगेश वाहक यांनी काम पाहिले आहे दाखल गुन्ह्यात सागर पानमंद, सहा. पोलीस निरीक्षक पो हवा अस्लम अत्तार, पो.शि. संतोष जाधव यांनी तांत्रीक पुरावा गोळा करणेकामी मदत केली आहे. तसेच तपासामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. ब्रिजेश सिंह, भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, गणेशखिंड आणि हाथवे इंटरनेट यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. याकामी सरकारी पक्षाच्या वतीने अॅड.बोधिनी मॅडम यांनी व पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस उपनिरीक्षक रेणुसे यांनी कामकाज पाहिले आहे.