पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १९/०४/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे व स्टाफ असे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना माहिती मिळाली की, मार्केट यार्ड पुणे येथील बिबवेवाडी गंगाधाम चौकाकडे जाणा-या सार्वजनिक रोडवरील कांचनगंगा अमोलोक सोसायटी, कावेरी अमृतुल्य समोरील सार्वजनिक रोडवर एका दुचाकीवरुन एक इसम एम डी या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मार्केट यार्ड पुणे येथील बिबवेवाडी गंगाधाम चौकाकडे जाणा- या सार्वजनिक रोडवरील कांचनगंगा अमोलोक सोसायटी, कावेरी अमृतुल्य समोरील सार्वजनिक रोडवर येथे एक इसम एका काळ्या रंगाचे दुचाकीवर संशयितरित्या बसलेला दिसला त्याबाबत छापा कारवाई करुन नमुद इसम नामे यश कुंडलिक गायकवाड वय २३ वर्षे, रा. आनंदनगर, मार्केट यार्ड, गंगाधाम चौक, पुणे, मुळ रा. मु.पो.नांदुरघाट ता. भुम, जि. बीड यास ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एकुण किं.रु.२,५१,०००/- चा ऐवज त्यामध्ये कि रु.१,४१,०००/- चा ११ ग्रॅम ०५० मिली ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, कि.रु.२०,०००/- चा मोबाईल फोन कि. रु. १०,०००/- रु ची दुचाकी असा ऐवज व अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला आहे. त्याबाबत मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गुरनं १०५/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २२ (ब) २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच दि.२०/०४/२०२३ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व स्टाफ असे कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके यांना माहिती मिळाली की, वडाची वाडी गाव, उंड्री पुणे येथे एक इसम त्याचे ओळखीच्या लोकांना गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे.•● मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कोंढवा येथील जुना सर्वे नं.५५ नवीन सर्वे नं. १३/२ येथील प्लॉटिंगमधील वस्तीमधील अंतर्गत २० फुटी सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी वडाची वाडी गाव, उंड्री पुणे येथे इसग नागे राजाराम नाना धनवट वय ४० वर्षे, रा. जुना सर्वे नं. ५५, नवीन सर्वे नं. १३/२ वडाचीवाडी उंड्री पुणे. मुळ रा. मु.पो.खांडगाव, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर हा त्याचे ताब्यात कि.रु. २४,९२०/- चा ०१ किलो २४६ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आला असल्याने त्याचे विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गुरनं ४१२ / २०२३ एन. डी. पी. एस. अॅक्ट क. ८ (क) २०(२) (ii) (4) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री सुनिल पवार यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार विशाल शिंदे, मनोजकुमार साळुंके, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, मारुती पारधी, विशाल दळवी, राहुल जोशी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव योगेश मोहिते यांनी केली आहे.