महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन अकोला प्रतीनिधी:- राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात विमेदार रुग्ण तपासणी करिता सदर सेवा दवाखान्यात आले असता त्यांच्यावर सुरू असलेल्या आजारासंबंधी तथा उपचाराची नोंद ओपीडी स्लीप करण्यात येते होती परंतु बरेचसे विमाधारक रुग्ण हे ओपीडी स्लिप गहाळ करतात व जुनी ओपीडी स्लिप गहाळ झाल्यास मागील उपचार व औषधी घेतल्याची नोंद याचा बोध होत नाही त्यामुळे विमेदार रुग्णाची व कुटुंबियाची आजाराची उपचाराची माहिती व्यवस्थित रित्या जतन करून ठेवण्याकरिता व उमेदवाराच्या सुविधे करता राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात त्यांना एक वही किंवा लेटर बुक आणण्याकरता सांगण्यात येत होते व ती वही किंवा लेटर बुक त्यांच्याकडेच ठेवण्याकरिता सांगितले जात होते.
उपचार घ्या किंवा नका घेऊ तरीही कामगार विमा धारकाकडुन दरमहा १७५ रु किंवा अधिक पगार मधुन कापले जातात व तरीही हा वही, लेटरबुक चा अधिकचा खर्च कामगारांवर लादुन एक प्रकारे कामगारांना वर अन्याय होत होता म्हणून सामाजिक कार्यकर्ता तथा महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीची दखल घेत कर्मचारी राज्य विमा निगम शाखा कार्यालय अकोला यांना सदर हेल्थ बुक किंवा अभिलेख चिकित्सा लिफाफा चा पाठपुरावा करण्याबाबत १७/०२/२०२३ अन्वये कळविण्यात आले होते.
त्यानुसार स्थानिक कार्यालय यांचेकडून अभिलेख चिकित्सा लिफाफे प्राप्त झाले आहेत. तरी कामगार विमेदार रुग्णाची नोंद तथा आजारांची नोंद सदर अभिलेख चिकित्सा लिफाफा मध्ये केल्या जात आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीनुसार कामगार विमेदार रुग्णांना लेटरबुक आणण्या करिता सांगण्यात व सक्ती करण्यात येत नाही तसेच कामगार विमेदार रुग्णाची गैरसोय होणार नाही याची कटाक्षाने दक्षता या राज्य कर्मचारी विमा निगम कार्यालया मार्फत घेण्यात येत असून सामाजिक कार्यकर्ता तथा महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उमेश सुरेशराव इंगळे यांच्या लढ्याला यश आले असून कामगारांना न्याय मिळाला आहे.