सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि.१ मे:- माउंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तथा
माउंट इंग्लिश मीडियम स्कूल बल्लारपूर येथे महाराष्ट्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शैलेश झाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शैलेश झाडे यांनी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनानिमित्त आपले विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. नंदकिशोर काकडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. श्री. राकेश साटोणे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयीन शिक्षक वर्ग, प्राध्यापिका सौ. प्रीती बल्लावार प्राध्यापिका सौ.स्मिता दोरनालवार, प्रा. लुकेश लोधे , प्राध्यापिका सौ . सरोज काकडे, प्राध्यापिका सौ. रूपाली खोब्रागडे, प्रा. संतोष वनकर, अर्चना अमराज, सौ .वर्षा चव्हाण, सौ. स्वरूपा नल्लाला, प्रणय मॅडम, नेहा मॅडम, सुनील बुरसे, प्रीतम कोहपरे , तुषार आसुटकर, प्रशांत वरारकर, रजा रमीज शेख आदी उपस्थित होते.

