सौ. हानिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर मो.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हात मागील तीन चार दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यात नांदगाव (पोडे) येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शनिवार (दि.२९) एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता दरम्यान प्रचंड मेघगर्जना आणि विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे वीज पडून दोन दुधाच्या गाई ठार झाल्या. या घटनेमुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे ) येथील शेतकरी नारायण दत्तू परसूटकर यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. या ठिकाणी दोन दुप्त्या गाई व अन्य जनावरे बांधली होती. शनिवारी रात्री ९.३० वाजता दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसात दोन गाईच्या अंगावर वीज पडली. यात नारायण परसूटकर यांच्या दोन गाई जागीच ठार झाल्या. यामुळे दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी संदीप परसूटकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी या घटनेची माहिती बल्लारपूर येथील पशुवैधकीय अधिकारी डाँ. रामटेके यांना संदीप परसूटकर यांनी दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. निसर्गाच्या प्रकोपाने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचे वीज पडून गाई दगावल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने शासनाने मदत द्यावी, असी मागणी चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंदा पोडे यांनी केली आहे.

