अहेरी पंचायत समिती माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते वाटप
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यांतील राजाराम (खां)येते न्यू स्टार बौद्ध मंडळ कडून वैशाख बुद्ध पौर्णिमा साजरा करण्यात आले असून तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेंडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून निळा ध्वजारोहन मंडळाचे अध्यक्ष आयु, साईंनाथ दुर्गे यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पांढरे शुभ्र टी-शर्ट पाठवण्यात आले असून सदर टी-शर्ट अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्करभाऊ तलांडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजारामचे सरपंच श्री. नागेश कन्नाके होते, तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयु. विठ्ठल भासरकर तर आभार प्रदर्शन स्वामी जनगाम यांनी केली.
यावेळी मंचावर गणपत दुर्गे,हनमतू गोंगले,शंकर गोंगले, जयराम दुर्गे, बोंदया दुर्गे, तुळशीराम बोरकर, नामदेव दुर्गे, दीपक अर्का, प्रभाकर दुर्गे, जुमडे काका, नीता रामटेके मँडम, छत्रपती गोवर्धन, गोविंदा गोंगले आदि होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मंडळाचे पदाधिकारी तिरुपती दुर्गे, मधुकर गोंगले, भीमराव गोंगले, सुधाकर गोंगले, राजेश दुर्गे, व्येंकटेश गोंगले, विलास दुर्गे, भास्कर दुर्गे, किशोर गोंगले, सोनलाल बोरकर, हंनमतू झाडे, शंकर झाडे, रेखा गोंगले, लिंबूना गोंगले सह यावेळी बौद्ध उपासक, उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.

