अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वैशाख बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्त युवा जागृती मंडळाच्या वतीने सावनेर बसस्थानक जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून सामुहिक बुध्द वंदना भदंत शिल रक्षित महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
त्यानंतर शेकडोच्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांना खीर चे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप नेते रामराव मोवाडे, खाण कामगार नेते प्रभाकरराव गजभिये, पत्रकार सुधाकरराव बागडे, सुजित बागडे, होमेश्वर डोंगरे, सुधाकर राव, गजभिये, राजूभाऊ घुगल, परमानंद मानवटकर, डॉ.मरफी गजभिये आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव विकी शेंडे यांनी केले, संचालन सोनू गजभिये व आभार प्रदर्शन स्तूप बागडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांताबाई मानवटकर, ज्योती गजभिये, अंजली कनोजीया, चंदु गोंडुले, राजेश बडखाने यांनी परीश्रम घेतले.

