पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
लोणीकाळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन पुणे :- लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं २७५/२०२३ भादवि कलम ३७९ मधील फिर्यादी नामे अनुराग चंद्रभूषण रागी वय ४० वर्षे, धंदा नोकरी रा साई पार्क, मावलीनगर, विपी, पुणे १५ यांनी त्यांचे मेंटनन्स व देखरेखीचे काम पाहत असलेल्या इंडस टॉवर, बेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि.पुणे येथील टॉवरच्या केवल बैटरी व इतर साहित्य दि.०३/०३/२०१३ रोजी रात्री ११.१० वा.चे पूर्वी ते दि. १८/०४/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. थे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी झालेबाबत तक्रार नोंद केलेली आहे. नमूद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेकामी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो, दत्तात्रय चव्हाण यांनी पोउपनि अमीत गोरे व तपास पथकातील अंमलदारांना आदेशीत केल्याने त्या अनुशंगाने अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असता तपास पथकातील पोलीस अमलदार शैलेश कुदळे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, ‘लोणी काळभोर पोलीस ठाणे परीसरामधील मोबाईल टॉवरचे केबलची चोरी करणारा इसम हा एच.डी.एफ.सी बैंक, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे येथे येणार आहे त्याचे अंगावर पिवळ्या रंगाचा गोल गळ्याचा फुल भायाचा टि-शर्ट घातला असून काळ्या रंगाची अरमानी पॅन्ट घातली आहे वगैरे माहीती मिळाल्याने सदर बाबत मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण सो यांना कळविले असता त्यांनी सापळा रचुन सदर आरोपीस ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शन केले. त्या प्रमाणे अमित गोरे पोलीस उपनिरिक्ष, लोणी काळभोर पोलीस स्टेशन व तपासपथकातील स्टाफ यांचेसह एच.डी.एफ.सी बैंकचे पाठीमागे मोकळ्या जागेत, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे येथे सापळा रचुन थांबून असताना बातमीदाराने वर्णन सांगीतल्या प्रमाणे एक इसम एच.डी.एफ.सी बँकचे पाठीमागे मोकळ्या जागेत, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे येथे आला त्यावेळी वरील स्टाफचे मदतीने त्याला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव १) अतिश राजु साठे, वय १९ वर्षे धंदा मजुरी, रा. वेताळबाबा वसाहत. गणपती मंदिराचे पाठीमागे, हडपसर गाडीतळ, पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्याचेकडे लोगी काळभोर गु.र.न. २७५/२०२३ भादवि कलम ३७९ याबाबत विचारणा केली असता त्याने सदर ठिकाणी चोरी ल्याची कबुली दिलेने पर नमुद आरोपीतास लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं २७५ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्यामध्ये दिनांक ०३/०५/२०२३ रोजी २०/१५ वा. अटक करण्यात आलेली आहे. दाखल गुन्हामध्ये त्याचेकडे कसून तपास केला असता त्यांनी लोणी काळभोर परीसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे मोबाईल टॉवरचे केवल व इतर साहित्याची चोरी त्याचे इतर साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे अटक आरोपीताचे मदतीन त्याचे साथीदार नामे १) प्रशांत मच्छींद्र वारे वय २५ वर्षे रा सध्या फ्लॅट नं ३०३ बिल्डींग नं बी ०६, अंतरिद्वा हौसिंग सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी पुणे मुळ कोपटी, ता. शिरुरकासार जि. बीड २) अखिलेश रामचंद्र गौतम वय २३ वर्षे धंदा- भंगार व्यवसाय रा सध्या चारवाडा, मांजरी बु धांदडे यांचेकडे भाडयाने हडपसर, पुणे मुळ रा सिद्धार्थनगर, इटवा, उत्तरप्रदेश यांना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून ३०,०००/- रू किंमतीचे ५० किलो ग्रॅम वजनाच्या मोबाईल टॉवरच्या केबलमधील तांब्याच्या तारा दाखल गुन्हयात जप्त करण्यात आल्या असून लोणीकाळभोर पोलीस स्टेशन अभिलेखावरील खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असून अधिक तपास सुरू आहे.
१) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं ८६/ २०२३ भादवि कलम ३७९
२) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं २७५/२०२३ भादवि कलम ३७९
३ लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं १९७ / २०२२ भादवि कलम ३७९
४) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर न २४३ / २०२२ भादवि कलम ३७९
५) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं ३२१ / २०२२ भादवि कलम ३७९
६) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं ५५८/२०२२ भादवि कलम ३७९
७) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुर नं ६६०/२०२२ भादवि कलम ३७९
सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. रितेशकुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-५, मा. बजरंग देसाई सहा पोलीस आयुक्त सो, हडपसर विभाग, मा. दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक गो. मा.सुभाष काळे पोलीस निरीक्षक साो. (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली तपास पथकातील अधिकारी पोउपनि अमित गोरे, पो.हवा पोहवा, नितिन गायकवाड, पो.हवा, सुदर्शन बोरावके, पो. हवा. सतिश सायकर, पो.ना. श्रीनाथ जाधव, पो.ना. सुनिल नागलोत, पो.ना. संभाजी देवीकर, पो.ना दिगंबर जगताप पो. शि निखिल पवार, पो.शि. दिपक सोनवणे, पो.शि. चक्रधर शिरगीरे, पो.शि. शैलेश कुदळे, पोशि बाजीराव वीर, याचे पथकाने केली आहे..

