पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
लोणीकंद पोलिस स्टेशन पुणे शहर.
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- केसनंद येथील एचपी पेट्रोल पंपाच्या समोरील बाजुस मोटारसायकल वरून जाणाऱ्या तरूणास पकडून त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याच्या खिशातून दोन हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
ओंकार नरहरी आळंदे (21, रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) आणि तानाजी अर्जुन जाधव (21, रा. लाडबा वस्ती, केसनंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात करम हसुन मनिहार (20, रा. केसनंद) याने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी सकाळी 11.30 वाजता फिर्यादी करम हे त्यांच्या मोटारसायकलवरून केसनंद येथील एचपी पेट्रोल पंपाच्या समोरून जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांना धारदार शस्त्राने जखमी केले. त्यांच्याकडील दोन हजार रूपये जबरदस्तीने चोरून नेले. करम यांनी लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी ओंकार आळंदे आणि तानाजी जाधव याला अटक केली आहे.ते दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहेत.
गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव करीत
आहेत.

