प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोठ्या उत्साहात बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. दिनांक पाच मे 2023 रोजी महाकारूणीक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या 2567 जयंती निमित्ताने प्रियदर्शि सम्राट अशोक बुद्ध विहार, भीमनगर वार्ड, संघमित्रा बुद्ध विहार खंडोबा, हनुमान वार्ड यांच्या वतीने भव्य धम्मरॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हि धम्मरॅली लोटन चौक इथून शहराच्या प्रमुख मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते इंदिरा गांधी चौक, नगरपरिषद चौक, कारंजा चौक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तहसील कार्यालय ते सिद्धार्थ नगर दीक्षाभूमी मैदान इथपर्यंत काढण्यात आली. या धम्म रॅली मध्ये शहरातील मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध उपासक उपासिका तसेच भारतीय बौद्ध महासभा व विविध आंबेडकरी संघटनानी यात सहभाग घेतला होता.

जग मे बुद्ध का नाम है.. यही भारत की शान है.. बुद्ध धम्म की क्या पहचान… मानव मानव एकसमान… या धम्म घोषणेने हिंगणघाट शहर दुमदुमून गेले. शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून दीक्षाभूमी मैदान येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम एड. ऋषी सुटे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महाकारूणीक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामुदायिक रित्या बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना बुंदी व जिलेबीचे वाटप करण्यात आले.
यावेळी शंकर मुंजेवार, गोरख भगत सर, लहुदास खोब्रागडे, प्राचार्य अस्मिताताई दारुंडे, भगत, प्रा. अरुण भगत, बबिताताई वाघमारे माजी नगरसेविका, रसपाल शेंदरे इत्यादींची उपस्थिती होती.
या धम्म रॅलीला यशस्वी करण्याकरिता शोभाबाई कांबळे, सुजाता रामटेके, कमल पाटील, शोभा वानखेडे, योजना वासेकर, रीना लोहकरे, नीलिमा शेंदरे, प्रिया लखोटे, वंदना भगत, आचल कांबळे, रेणुबाई चहांदे, पारु वासेकर, मोनाली सोयाम, पल्लवी ढवळे, अजिंक्य फुललेले, प्रशिक थूल, सार्थक शेंदरे, हर्ष पाटील, संकेत मून, शुभम कांबळे, प्रज्वल कांबळे, अमन निमसरकार, आशू फुलकर, चंदन थूल, मंगेश पाटील सह भीमनगर वॉर्डातील महिलांनी आणि संघमित्रा बुद्ध विहार बौद्ध महिला मंडळांनी विशेष सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क करा प्रशांत जगताप संपादक 9766445348 /7385445348

