पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- लोणीकंद पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनिल पोपट मोर वय २५ वर्षे, रा. गाडेगाव नाहेरवस्ती वाडेबोल्हाई ता. हवेली जि.पुणे यांस पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०४ पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पुणे जिल्ह्यातुन ०२ वर्षाकरीता तडीपार केले आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील माडेबोल्हाई, अष्टापुर फाटा तरोब आसपासच्या भागात दहशत निर्माण करून लोकांना तसेच सामान्य नागरीकांना वारंवार त्रास देणाऱ्या, दहशत निर्माण करून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या कृत्यामुळे लोकांच्या मनातुन कायद्याविषयी संभ्रम निर्माण होवु नये तसेच सदर सराईत गुन्हेगारावर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने सदर इसमावर मा. सहा. पोलीस आयुक्त श्री किशोर जाधव लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री मारुती पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळती पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी सदर सराईत इसम याचेवर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन सदर इसम यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे तडीपार करणेबाबत पोलीस उप आयुक्त श्री शशिकांत बोराटे यांना प्रस्ताव पाठविला असता श्री शशिकांत बोराटे यांनी सदर सराईतास पुणे जिल्ह्यावे हद्दीतून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त सो. श्री. रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त सो. श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो. श्री. किशोर जाधव, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मारूती पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु, बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, किरण पड्याळ, अमोल ढोणे, साई रोकडे, दिपक कोकरे, विजय आवाळे यांनी केली आहे..

