पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि.०२/०५/२०२३ रोजी कोथरुड पोलीस ठाणेकडील पो.उपनिरी. बी. एम. माळी. पोलीस अंमलदार, चौगुले, सुळ वाल्मिकी, राऊत, शेळके असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार, राठोड, वाल्मिकी यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत आयडीएल कॉलनी, कोथरुड येथील मैदानाजवळ एक इसम त्याचे कमरेला पिस्टल लावुन संशईतरित्या वावरत आहे अशी बातमी प्राप्त झाली.
सदर बातमीचे ठिकाणी जावुन थांबुन विभागुन दबा धरून खात्री केली असता बातमीचे ठिकाणी एक इसम त्याचे कमरेला पिस्टल लावुन संशईतरित्या वावरत असताना दिसुन आल्याने पोलीस स्टाफने विभागुन मोठ्या शिताफीने आरोपी रोहन कैलास राऊत, वय १८ वर्षे, रा. गल्ली नं. ७१, जनता वसाहत, कोथरुड, पुणे यास ताब्यात घेवुन, त्याची झडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत राऊंड असे एकूण ३०,५००/- रु किचा मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आला आहे. तसेच त्याचेविरुध्द कोथरुड पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं. १०८ / २०२३, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- ३, पुणे शहर श्री. सुहेल शर्मा, मा. सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), बाळासाहेब बड़े, पोउपनिरी माळी, पोलीस अंमलदार, चौधर, सुळ वाल्मिकी, दहिभाते, शिर्के, राठोड, शेळके व राऊत यांनी केलेली आहे.

