पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक ०६/०५/२०२३ रोजी दुपारी ०४.५७ वा चे सुमारास फिर्यादी मनोज रामचंद्र आदलिंगे, वय २८ वर्षे, चंदा व्यवसाय, रा. सव्र्हे नंबर ६७/३/४/५ माऊली कृपा, दिग्विजय लेन नंबर ४, संतोषनगर कात्रज, पुणे यचि मोबाईल शॉपीवर मोबाईल नंबर ८६६९३२२६२० यावरील इसमाने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना त्याचे सासरे आजारी असुन त्यांना हॉस्पीटलचे बील भरण्यासाठी ३०,०००/- रुपये पाठवायचे आहेत असे सांगुन त्याचेकडून ३०,०००/- रुपये पाठवुन व त्याचे मोबाईलवे २४०/- रुपयांचे रिचार्ज करवुन घेवुन त्यांना त्यांचे एकुण ३०,५४०/- रुपये न देता फसवणुक केली आहे. तसेच त्याच मोबाईल नंबर धारकाने दिनांक १०/५/२०२३ रोजी दत्तनगर भागातील जे. आर. एस मोबाईल शॉपीमधील मालक अरीफ शेख, रा. दत्तनगर, आंबेगाव बु. पुणे यांचेकडुन देखील ऑनलाईन ३०,०००/- रुपये पाठवुन घेवुन त्यांना ३०,०००/– रुपये न देता त्यांची देखील फसवणुक केली आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील आरोपी मोबाईल नंबर धारक ८६६९३२२६२० याचा भारती विद्यापीत पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे तांत्रिक विश्लेषणाचे आधारावरून शोध घेत असताना पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश ढमढेरे यांना अरोगी सच्चाईमाता येथे असल्याची माहीती मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अमलदार यांनी संपुर्ण कात्रज, आंबेगाव, सच्चाईमाता परीसराची संपुर्ण पाहणी केली असता सदर मोबाईल नंबर धारकाचा शोध घेतला असता नमुद मोबाईल नंबर धारक अभिषेक विजय तांबे, वय २३ वर्षे, रा. मुळ रा. १३ ताडीवाला रोड, ५ बिल्डींग, शुरवीर मित्र मंडळाचे मागे, पुणे सध्या रा. जैन मंदीर, अटल ११, साई काळेदुकान ३ रा मजला, सच्चाईमाता कात्रज, पुणे हा जैन मंदीराचे आडबाजुस मिळुन आल्याने त्याचेकडे तपास करता त्थाने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे अटके दरम्यान आरोपीकडे आणखीन तपास केला असता त्याने आणखीन मनी ट्रान्सफर करणारे व्यवसायीकांची फरावणक केली असल्याचे सांगत आहे तरी आरोपीकडून आणखीन दुकानदारांना फसविले असल्याचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश ढमढेरे, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले, हर्षल शिंदे, सचिन गाडे, मंगेश पवार, धनाजी धोत्रे, अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

