Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

वनहक्कासाठी शेतकऱ्यांसह माजी आमदार आत्रामांची तहसील कार्यालयावर धडक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 14, 2023
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
वनहक्कासाठी शेतकऱ्यांसह माजी आमदार आत्रामांची तहसील कार्यालयावर धडक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित वन हक्क दाव्यांच्या मंजुरी मिळण्यासाठी शेतकऱ्यां सह माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या नावाने निवेदन पाठविले आहे. गडचिरोली जिल्हातील अतिदुर्गम, अविकसित, मागास, नक्षल प्रभावी 198 गावातील आदिवासी शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित अतिक्रमित शेतीचे वनहक्कासाठीचे दावा प्रस्ताव अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ नुसार, २०१३ साली शासनाच्या वनहक्क समितीकडे सादर करण्यात आले आहेत, त्यानंतर २०१४ साली उपविभाग स्तरीय वनहक्क समिती, तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांच्या कार्यालयात सुनावणी होऊन प्रस्तावातील त्रुटी सादर करण्यात आल्या होत्या, मात्र दावे सादर करून दहा वर्षाचा कालावधी होऊनही तीन ते साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या दाव्यांना समिती कडून मंजुरी देण्यात आली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादने विक्री करण्यास व शासनाच्या शेती उपयोगी विविध लाभाच्या योजना मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अतिक्रमण धारक शेतकऱ्यांकडे कुटुंबाच्या उपजीविकेसाठी अतिक्रमीत शेती शिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसून अतिक्रमीत शेतीचे प्रलंबित वनहक्क दावे मंजूर करण्याची मागणी भारत राष्ट्र समितीचे नेते, आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष, माजी आमदार दिपकदादा आत्राम, मूलनिवासी हक्क संघर्ष समिती अध्यक्ष मनोहर बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, माजी जिल्हा परिषद सदस्य कारूजी रापंजी, माजी प.स.सदस्य मंगेश हलामी, आविस सल्लागार अडवे कांदो, आविस सल्लागार शंकर दासरवार, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, आविस तालुका सचिव नानेश गावडे, दोहे हेडो, दीपक मडावी, लुला तलांडे, बासू गावडे, चंदू पुंगाटी, रमेश गावडे, सैनू हेडो, महारू तलांडे, कोलू तलांडे व उपस्थित शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिल भांडेकर यांचे मार्फत जिल्हाधिकारी संजय मीना यांना पाठविलेल्या निवेदनातून केले असून येत्या सात दिवसात मागणीची पूर्तता न झाल्यास आदिवासी विद्यार्थी संघ व भारत राष्ट्र समिती एटपल्लीच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

राज्यात अनुसूचित जाती – जमातीसाठी योजनेची पुनर्रचना, गाई आणि म्हशींच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात वाढ

Next Post

कर्नाटक विजयाचा अहेरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने विजय जल्लोष उत्सव साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कर्नाटक विजयाचा अहेरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने विजय जल्लोष उत्सव साजरा.

कर्नाटक विजयाचा अहेरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने विजय जल्लोष उत्सव साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In