✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- गिरड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आकाश बावणे व सौ. ज्योतीताई बावणे विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले, माजी पंचायत समिती सदस्य मुरलीधरराव पर्बत, दिनकरराव गिरडे, जेष्ठ समाजसेवक दाबणे गुरुजी यांनी विजयी उमेदवाराचे पुष्पहार घालून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवें, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, सुभाषभाऊ चौधरी, गिरडचे उपसरपंच मंगेशभाऊ गिरडे, माजी सरपंच विजय तडस, दिपक पढंरे, अमोल पर्बत, राकेश चंदनखेडे,मनोज गिरडे, क्रीष्णाजी राऊत, बालूभाऊ घाटे, उमेश नारनवरे, निलेश खाटीक, ग्रा. सदस्य शालूबाई अंबादरे, राजुभाऊ तेलरांधे आदी मान्यवर उपस्थित होते..

