पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखा
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड येथील स्थाचे नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायदयासाठी अवैध रित्या मुलींना स्वाचे नावाखाली जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमलदार यांना प्राप्त झाली.
त्यानंतर अशा दलाल व्यक्तींची गोपनीय माहिती काढून, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक १८/०५/२०२३ रोजी सापळा रचून बनावट ग्राहका करवी वेश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता, दलालाने सांगवी परिसरातील JASMINE FAMILY SPA सर्वे नं. ७१/१/२/६० मेन रोड, कृष्णानगर, नवी सांगवी पुणे येथे अचानक छापा टाकला असता, आरोपी १) कुणाल राममुर्ती रेड्डी, वय ३९ वर्षे रा. १९/३ नाईक याळ विमट्टी जवळ बोपोडी, पुणे मो. नं. ७०६६०९५९३७ २) पाहिजे आरोपी महिला यांच्या ताब्यातून दोन मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केलेली आहे. आरोपी क्र. १ यास ताब्यात घेवून सांगवी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२९ / २०२३ भादवि कलम ३७० (३) ३४ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनय कुमार चौबे स. मा. पोलीस सह आयुक्त श्री. डॉ. राजय शिंदे सौ, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी सा मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. प्रशांत अमृतकर सो यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, विजय कांबळे, पोलीस अमलदार, सुनिल शिरसाट, सुधा टोके, मारुती करबुडे, गणेश कारोदे, सागर सूर्यवंशी, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यानी केली आहे.

