पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडुन राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत पथकाकडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक-२ कडील अंमलदार हे डेक्कन पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक १६/०५/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शेळके व योगेश मांढरे यांना मिळालेल्या माहितीवरुन सापळा कारवाई करुन सेन्ट क्रिस्पीस होम चर्च व शाळा यास लागुन असलेल्या फुटपाथवर एरंडवणे पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे संकल्प सुरेश सकपाळ, वय ३३ वर्षे, रा. बी. डी. डीचाळ, बिल्डींग नं. ११, रूम नं. ५१, वरळी, डॉ. जी.एम भोसले मार्ग, मुंबई याच्या ताब्यात किं.रु. ११,००,०००/- रु किमतीचे ५५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करुन त्याचे विरुध्द डेक्कन पोस्टे येथे गु.र.नं.८१/२०२३, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दि. १८/०५/२०२३ रोजी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या माहितीवरुन कोंढवा पोस्टे हद्दीत मुंढे व्यायाम हगवणे वस्ती, कोंढवा पुणे येथे इसम नामे शाहरूख मुस्तफा बेग, वय २१ वर्षे, रा स.नं.१३, गल्ली नं.५ आंबेडकरनगर, कोंढवा, पुणे यास संशयावरुन ताब्यात घेऊन त्याचे कडून किं.रु. १,४०,०००/- रु कि.चे मॅफेड्रॉन (एम.डी.) व ८१,०००/- रू कि चा चरस, हा अंमली पदार्थ जप्त करुन त्याचे विरुद्ध कोंढवा पो.स्टे. येथे गु.र.नं.५१४/२०२३. एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० ( ब ) (ii) (अ) २२ ( ब ) २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दि. २०/०५/२०२३ रोजी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या माहितीवरुन पुणे रेल्वे स्टेशन पार्सल गेट समोरील सार्वजनिक रोडवरुन दोन बिहार राज्यातील इसम नामे १) मंटु रामबाबु राय, वय ३३ वर्षे, रा. कौवा चौक, मु.पो. जौरपुर, जिल्हा समस्तीपुर, राज्य बिहार २) राकेशकुमार रामनाथ दास, वय १९ वर्षे, रा. मु.पो. खुसरूपुर, जिल्हा पटना, राज्य, बिहार बंडगार्डन यांचे ताब्यातुन किं.रु.१२,७३,८८०/- चा ६३ किलो ६९४ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त करुन त्यांचे विरुध्द बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. १५४ / २०२३ एन.डी.पी.एस अॅक्ट कलम ८ ( क ), २०(ब), (ii) ( क ), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री, अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, संदिप शेळके, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, संदिप जाधव, प्रशांत बोमादंडी, रविन्द्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, महेश साळुंखे, साहिल शेख, दिशा खेवलकर, नितीन जगदाळे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड त्यांनी केली आहे.

