शैलेश ओव्हाळ, पिपंरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येरवडा येथील प्रभाग क्रमांक ९ विक्रीकर भवन जवळील नवीन “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल” येथील दोन्ही बाजूला बस थांब्यावर नागरिकांना बसण्यासाठी आसान व्यवस्था नव्हती. त्यामुळे जेष्ठ नागरिक, लहान मुलांना, महिलांना एवढ्या भर ऊन्हात थांबवे आणि खाली फुटपाथवर बसावे लागत होते. त्यामुळे अपंग नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.
“जनसेवा हीच ईश्वरसेवा” म्हणून कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या येरवडा येथील पदाधिकारी यांनी नागरिकांना होत असलेल्या त्रासा याबाबत दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रभाग येरवडा शिवसेनाच्या वतीने पीएमपीएमएल बस खात्याला ऑनलाईन पद्धतीने तक्रार (नंबर WA 6008) दाखल केली होती. चार महिन्यांच्या पाठपुराव्यामुळे आज तेथे दोन्ही भागात नवीन बस स्टॉप स्थानक आसान व्यवस्था नागरिकांसाठी बसविण्यात आली आसून पलीकडे काम चालू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मागणीला यश आले आहे.
या परिसरातील नागरिकांनी सुहास फुलचंद कांबळे प्रभाग प्रमुख येरवडा, शिवसेना आणि मित्र परिवार येरवडा गाडीतळ पुणे शहर आणि पीएमपीएमएल बस खात्याला आभार व्यक्त मानले.

