तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो. 98224 77446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चुनाळा:- येथील मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या कु. तेजस्विनी गुलाब हेपट या अत्यंत सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने अथक परिश्रम पूर्वक पोलीस भरतीची तयारी केली. त्यात तीला यश प्राप्त झाले व तिची निवड मुंबई पोलीस दलात झाली. तिला मिळालेल्या या यशाबद्दल आई वडील व कुटुंबीयांना अतीव आनंद झाला. तिच्या निवडीबद्दल माजी आमदार सुदर्शन निमकर व सौ.वर्षा निमकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून अभिनंदन केले व पुढील उज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच बाळू वडस्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, प्रा. शंकर पेडुरवार, सेवा सहकारी संस्था चुनाळा चे उपाध्यक्ष कृष्णा पोटे, संचालक बाबुराव निखाडे, मच्छिंद्र पा. मोरे, मुरलीधर पेठेकर, तुकाराम पा. हेपट, रमेश हेपट सह कुटुंबीय उपस्थित होते.
एकावर्षात चुनाळा येथील चार युवतींची व एका युवकाची पोलीस दलात निवड होणे ही चुनाळा वासीयासाठी अभिमानाची बाब आहे. इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा विविध क्षेत्रात कठोर परिश्रम केल्यास निश्चित पानाने यश मिळेल असा आशावाद याप्रसंगी माजी आमदार निमकर यांनी व्यक्त केला.

