संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- 2019 मध्ये एक संतापजनक घटना घडली होती. पती सोबत नांदत नसलेल्या पत्नीवरील रागातून साळीच्या एक महिन्याच्या चिमुकल्या बाळाचा क्रूर रित्या हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा नराधम आरोपीला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. हा निकाल सत्र न्यायालयाचे न्या. एस. ए. एस. एम. अली यांनी दिला. ही हृदयद्रावक घटना 2019 मध्ये नागपुर जिल्हातील पारशिवणी पासून 20 किलोमीटर लांब असलेल्या बखारी (पिपळा) गावात घडली. गणेश गोविंद बोरकर वय 45 वर्ष असे आरोपीचे नाव असून तो वडाेदा रोड, कुही येथील रहिवासी आहे. ताे 20 ऑगस्ट 2019 पासून कारागृहात आहे.
काय आहे घटना….
गणेश गोविंद बोरकर वय 45 वर्ष व त्याची पत्नी प्रतिभा यांचे एकमेकांसोबत पटत नव्हते. त्यामुळे प्रतिभा बखारी (पिपळा) येथे माहेरी राहायला गेली होती. दरम्यान, प्रतिभाची भामेवाडा, ता. कुही येथील लहान बहीण रुपाली पांडे वय 28 वर्ष हिने नुसताच एक मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे आई-वडिलांनी तिला आराम करण्यासाठी माहेरी आणले होते. 19 ऑगस्ट 2019 रोजी दुपारी रुपाली तिच्या मुलासह घरी होती. त्यावेळी आरोपी आपल्या माहेरी आला व प्रतिभा कोठे आहे, अशी विचारणा केली. यावेळी रुपालीने त्याला सांगितल की, प्रतिभा मजुरीच्या कामासाठी शेतात गेली. त्यानंतर आरोपीने तिला रुमाल धुवून मागितला. रुपाली नवबाळंतीन असल्यामुळे ती रुमाल धुण्यासाठी शेजारच्या बाईकडे गेली. तिचा मुलगा घरात झोपला होता. आरोपीने त्याचा पोटात चाकू भोसकून खून केला. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. पंकज तपासे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी 9 साक्षीदारांचे जबाब व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.

