उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- भटके विमुक्त कल्याण समितीच्या सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व संघटना प्रतिनिधी यांच्या समवेत सहा कलमी कार्यक्रमावर चर्चा व उपाययोजना याबाबत सांगली जिल्हा समाज कल्याण सहा.आयुक्त जयंत चाचरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये शिक्षण, विद्यार्थी शिष्यवृत्ती, नागरिकत्वाचे दाखले, मतदार नोंदणी,जातीचें दाखले व जात पडताळणी करते वेळी येणाऱ्या अडचणी, घरकुल व निवारा व घरकुल योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, शाळाबाह्य मुले, भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृहे, बार्टीच्या धर्तीवर स्वतंत्र संशोधन संस्था व गायरान अतिक्रमण यावर उपस्थित संघटना प्रतिनिधींनी अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित केले, यावर सहा.आयुक्त चाचरकर साहेबांनी समाधानकारक उत्तरे दिले. तसेच त्यांच्या कार्यकक्षेत असलेल्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाच्या समन्वयाने तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच यापुढे भटके विमुक्त कल्याण समितीची नियमित मासिक बैठक घेऊन समाजातील विविध समस्या व प्रश्न निराकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सांगली जिल्हा भटके विमुक्त विकास मंचचे विविध तालुक्यातून व जातसमुहातून प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये रामभाऊ शिकलगार, लक्ष्मण चव्हाण, अनिल मोरे सर, रमेश जावळे, सुरेश माने, रिटा माने, अनिल पवार, आप्पासाहेब माने व भटके विमुक्त कल्याण समितीचे जिल्हा निमंत्रित सदस्य मुनीर शिकलगार उपस्थित होते.

