आकाश पांचाळ, पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पुणे:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. एका 37 वर्षीय विधवा महिलेला मुलाला जीवे मारून टाकेल व बदनामी करेल’ अशी धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रल्हाद रामदास तांदळे वय 36 वर्ष कवडे हॉस्पीटल समोर उत्तमनगर याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रल्हाद रामदास तांदळे वय 36 वर्ष हा रचनात्मक सेवा संस्थेचा अध्यक्ष असून याच्या विरोधात 36 वर्षीय विधवा महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे.
काय आहे घटना…..
तक्रार करती महिला ही विधवा असून सामाजिक कार्यकत्याशी संपर्क येत असताना ती आरोपी प्रल्हाद रामदास तांदळे याच्या संपर्कात आली. प्रल्हाद याने प्रेम असल्याचे सांगून लग्न करणार असे सांगून गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून त्याने पिढीत महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी लाॅजवर नेऊन बलात्कार केला. तिच्या घरी राहण्यास येऊन धमकी देऊन अनेकदा बलात्कार करत असल्याने पीडितेने पोलिसांना सांगितले.
धमकी देऊन अत्याचार…
‘तुझ्या मुलाला जीवे मारून टाकेल व बदनामी करेल’ असे बोलून विधवेवर वारंवार बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रल्हाद तांदळे याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहे.

