✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा.न.9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील पोहणा सर्कल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत यांच्या उपस्थित मध्ये अनेक युवा महिलांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. यात गुरुदयाल सिंग जुनी यांच्या शेकडो मित्र परिवारांनी पण पक्ष प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकाचे स्वागत करून त्यांना पक्षाचा दुपटा घालून पक्षात प्रवेश देण्यात आला. पोहणा सर्कल मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश झाल्याने या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत झाला आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत या परिसरात बळकटी येणार असे चित्र दिसून येत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्धा जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, ओंकार मानकर माजी पंचायत समिती सदस्य, हिंगणघाट युवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुल भाऊ वानखेडे, पोहणा सरपंच नामदेवराव राऊत, वडनेर ग्रामपंचायत सदस्य गुरुदयालसिंग सामाजिक कार्यकर्ते अनिल कोंबे, सामाजिक कार्यकर्ते अतुल धाडवे, मारोतराव हुलके, विजय लाटकर, वैभव हुलके, अक्षय जुनघरे, निलेश कुडमते, प्रकाश ठाकरे, विठ्ठल वाघ, सुरेश कोल्हे, नरेंद्र वाघ, प्रफुल धाडवे, संजय धाडवे, जीवन हुलके, यश हुलके, प्रतीक हुलके, विक्रम केराम, सुरेश भुजाडे, बंडू ठाकरे, विठ्ठल धोटे, राजू हुलके, वासुदेव हुलगे, अरविंद डंबारे, दिगंबर किरण, उत्तम केराम, चरणदास कुडे, जयवंत ठाकरे, रामदास फुलके, आनंदराव ठाकरे, राजूभाऊ कोल्हे, अशोकराव धाडवे, अशोकराव ठाकरे, विठ्ठलराव ठाकरे, अशोक कळसकर, जगदीश हुलके, शंकर केराम महिला सौ. रूपालीताई लाटकर ग्रामपंचायत सदस्य भिवापूर, सौ. प्रतिभा धोटे, सौ. नंदाताई ठाकरे, सौ. इंदिरा केराम, सौ. दुर्गाताई हुलके, सौ. पपीता केराम, सौ. भिमती हूलके, सौ. भीमती साखरकर, सौ. कमलाताई ठाकरे या सर्वांनी भव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

