महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांना निवेदन देण्यात आले.
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हा उद्योग केंद्र विभागातील आधिकारी व कर्मचारी हे शासन निर्धारित वेळे प्रमाणे काम करत नसुन कामात चुकारपणा करत आहेत जिल्हा उद्योग केंद्रात संपूर्ण सांगली जिल्ह्य़ातील काना-कोपर्यातुन लोक येतात शासन नियमा नुसार सायंकाळ ६ वाजेपर्यंत कार्यालयाचे कामकाज सुरू असले पाहिजेत परंतू जिल्हा उद्योग केंद्र विभागातील आधिकारी व कर्मचारी हे ४ ते ५ वाजताच आपली कामे बंद करून घरी निघून जातात आम्ही चौकशी केली असता मिळालेली माहीती अशी कि ते आधिकारी व कर्मचारी दुसऱ्या जिल्ह्यातील रहिवाशी असुन घरी परतण्यास उशीर होतो, गाडी मिळत नाहीत म्हणून हे आधिकारी व कर्मचारी आपल्या कामात कसूर करून मनमानी कारभार करत असल्याचे समजते म्हणून सेवक लोकहित मंच कडुन मागणी करण्यात येते कि ह्या कामचुकार आधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून ते कामाचा पद भार स्वीकारले पासुन आज पर्यंत च्या वेतनातुन ह्या तासा-दोन तासाची काम कमी केल्यामुळे रक्कम वसुल करुन त्यांच्या सेवापुस्तकेवर शेरा मारून त्याच्यावर योग्य कारवाई करून निलंबित करावे.
जिल्हा उद्योग केंद्र विभाग हे गोरगरीब, श्रमिक, गरजु लोकांसाठी महत्वपूर्ण विभाग असुन असे बाहेर जिल्ह्यातून आधिकारी व कर्मचारी ये-जा करणारे असतील तर त्याचा नागरिकांच्या कामावर परिणाम होणारच त्यामुळे आपल्याच जिल्ह्यातून आधिकारी व कर्मचारींची भरती करण्यात यावी किंवा स्थानिक जिल्ह्यातून नेमणुकीस काही नियम असतील तर बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या आधिकारी व कर्मचारी यांनी आपली नियुक्ती असल्या ठिकाणी शासन नियमानुसार पुर्ण वेळ देता येईल अशा ठिकाणीच राहण्याची सोय करून घ्यावी तसेच कार्यालयात येणे आणि जाने यावर अंकुश लावण्यासाठी अंगठा (बायोमेट्रिक) प्रणाली लवकरात लवकर सुरू करण्यात यावे.
वरील आमच्या मागण्या लवकरात लवकर मंजुर करून कामचुकार आधिकारी व कर्मचारी वर योग्य कारवाई करून अंगठा (बायोमेट्रिक) प्रणाली सुरू करण्यात यावे अन्यथा आम्हास सेवक लोकहित मंच कडुन संविधानिक पध्दतीने लढा उभा करावा लागेल त्याची संपूर्ण जबाबदारी हि आपलीच राहील असा इशारा सेवक लोकहित मंचकडुन देण्यात आला त्या वेळेस संस्थापक अध्यक्ष उमरफारुक ककमरी उपाध्यक्ष प्रशांत कदम, संघटक विज्ञान लोंढे,विजय वाघमारे, सचिन वाघमारे आदि उपस्थित होते.

