संदिप सुरडकर नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांची स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहचून रोमांचकारक स्थितीत पोहचली आहे. पण नागपुर शहरात आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांची करडी नजर आहे. मात्र, नागपुर शहरात कोट्यवधींच्या सट्टेबाजीचा बाजार मांडला आहे. त्यात पोलिसांनी धडक कारवाई करत सट्टेबाजाना अटक केली आहे.
आयपीएल सट्टेबाजी करणाऱ्या दोन आरोपी ला नागपुर युनिट 3 च्या क्राईम ब्रांचच्या पथकाने दोन किकेट सट्टेबाजाना अटक केले. बुधवारी लाखनो विरुध्द मुबंई सामन्या दरम्यान प्रविन गोपीचंद लुटे वय 39 वर्ष तुळशीबाग रोड कोतवली व परेश सारवाणी वर्धमान नगर लाकडगंज हे फोन च्या. माध्यमातून सट्टा लावत असल्याची माहिती युनिट 3 क्राईम ब्रांच यांना मिळाली.
आरोपी सामना सुरु असताना गरोबा मैदाना जवळील एका घरात धाड टाकून पोलीसानी लुटे यांना अटक केली. तर परेश पसार झाला त्यातून पोलिसांना पाच फोन, टी.व्ही, सेट टॉप बॉक्स, डोंगल, चार्जर, कागद पत्र व काही रोख असा 52,000 रुपये च्या मुद्देमाल जप्त केला. आरोपी ला कारवाई साठी लाकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीसानी योग्य रीतीने तपास केला तर नागपुर शहरातील सट्टा चालवणाऱ्या अनेक मोठ्या बुकीचे नावे समोर येऊ शकतात.

