बिलोली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बिलोली:- ‘स्वच्छ भारत, स्वच्छ गाव’चा नारा देत आपले गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन- प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. गावात स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. परंतु, बीलोली तालुक्यांतील लोहगाव येथे ग्रामपंचायतचा धृतराष्ट्राच्या भूमिकेमुळे सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. घाणीच्या साचलेल्या या कचऱ्यामुळे गावात डेंगू, हिवताप, मलेरिया यांसारख्या साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू व्हायला अगदी काही दिवस बाकी आहे. पण लोहगावात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. सर्वत्र नाल्या तुंबल्या असून, नाल्यातील सांडपाणी सार्वजनिक रस्त्यावर वाहत आहे. या घाण सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डास निर्माण झाले आहे व संपूर्ण गावात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लोहगाव येथे ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य तसचे पावसाळ्याच्या तोंडावर डेंगू, हिवताप, मलेरिया यांसारख्या साथीचे आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिका मधून उपस्थित केला जात आहे.
राज्यात कोरोणा व्हायरस ची तीव्रता कमी झाली, आणि ग्रामपंचायत निवडणुका झाल्या नवीन पदाधिकारी आल्याने गावातील समस्या सुटतील असे नागरिकांना वाटत होते. पण नव्याने सत्तेत आलेल्यानी गावातील समस्या सोडविण्या ऐवजी त्या भर टाकली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत वर गावातील नागरिक संताप व्यक्त करत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता संपर्क करा प्रशांत जगताप, मुख्य संपादक, 9766445348/7385445348

