Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वाळू माफियाची दादागिरी बीडमध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 27, 2023
in क्राईम, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वाळू माफियाची दादागिरी बीडमध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्य सरकार संपूर्ण राज्यात नवीन वाळू धोरण ठरवत आहे. दुसरीकडे मात्र वाळू तस्करी जोमात सुरू आहे. त्यात या वाळू माफियांची दादागिरी मोठ्या प्रमाणात वाढल्याची बघायला मिळत आहे. अशीच खळबळजनक माहिती समोर येत आहे.

वाळू माफियांची हिंमत इतकी वाढली की, बीडमध्ये थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर टिप्पर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरहून बीडला येताना एका वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने चक्क बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या गाडीला कट मारला. त्यानंतर सुरक्षा रक्षकाने एक किमीपर्यंत पाठलाग केला, परंतु तो हाती लागला नाही. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील पाडळशिंगीजवळ घडली असून, याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून वाळूमाफियांची दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

अधिक माहितीनुसार, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या त्यांच्या शासकीय कार MH 23 BC 7585 मध्ये छत्रपती संभाजीनगरहून बीडला येत होत्या. यावेळी त्यांचा बॉडीगार्ड सोबत होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे त्यांची कार आली असता एकाविना क्रमांकाच्या टिप्परने मुधोळ यांच्या कारला कट मारला. त्यानंतर पुढे गेल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या बॉडीगार्डने टिप्परला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने टिप्पर थांबवला नाही. तर मुख्य मार्गावरून गावातील रस्त्यावर टिप्पर घातले व काही अंतरावर जाऊन वाळू रस्त्यावर टाकून पळून गेला. हा प्रकार जिल्हाधिकारी मुधोळ यांनी तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळविला. त्यानंतर पोलिस यंत्रणा तत्काळ कामाला लागली व टिप्पर चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने मुधोळ यांनी काही दिवसांपूर्वी कारवाया केल्या होत्या. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्हाधिकारी मुधोळ या छत्रपती संभाजीनगर येथून बीडला येत असताना पाडळसिंगीजवळ त्यांना एक विना क्रमांकाचा टिप्पर दिसला. त्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर त्यांचा सुरक्षारक्षक पोलिस कर्मचारी खाली उतरून चालकाच्या बाजूने लटकले. वाहन थांबविण्यासाठी चालकाला सांगत होते. परंतु तो भीतीपोटी ट्रक चालक पळून गेला. दूरवर जाऊन त्याने वाळू खाली केली आणि तो फरार झाला. याबाबत जिल्हाधिकारी मुधोळ यांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना कॉल केला. तर जिल्हाधिकारी यांचा फोन येताच बीड, गेवराई आणि विशेष शाखेच्या पोलिसांना पोलीस अधीक्षक यांनी तपासाचे आदेश दिले, त्याप्रमाणे एलसीबीने टिप्पर ताब्यात घेऊन चालकालाही अटक केली आहे. चालका विरोधात कलम 307 प्रमाणे गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा घटनाक्रम पोलीस अधीक्षक यांनी माध्यमांना सांगितला आहे. तर वाळू माफियांची ही दादागिरी सहन केली जाणार नाही. या प्रकरणातच नव्हे, तर आता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही पोलिस अधीक्षक म्हणाले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क करा. प्रशांत जगताप संपादक 9766445348 – 7385445348

Previous Post

आगामी निवडणूका जिंकण्यास व लोकसभेचा हिशेब चुकता करण्यास जनसंपर्क महाअभियान यशस्वी करा: हंसराज अहीर

Next Post

कर्तव्य दक्ष निरीक्षक सिनिअर अधिकारी चंद्रकांत साळुंखे यांचा सेवक कामगार संघटने कडून सन्मान चिन्ह देऊन गौरव…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कर्तव्य दक्ष निरीक्षक सिनिअर अधिकारी चंद्रकांत साळुंखे यांचा सेवक कामगार संघटने कडून सन्मान चिन्ह देऊन गौरव…

कर्तव्य दक्ष निरीक्षक सिनिअर अधिकारी चंद्रकांत साळुंखे यांचा सेवक कामगार संघटने कडून सन्मान चिन्ह देऊन गौरव...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In