उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील कर्तव्य दक्ष निरीक्षक सिनिअर अधिकारी चंद्रकांत तातोबा साळुंखे यांची पदोन्नती झाले बद्दल, सेवक संघटित व असंघटित बांधकाम व सर्व श्रमिक कामगार संघटनेकडून अभिनंदन करून त्यांनी आज पर्यंत श्रमिक व कष्टकरी कामगारांच्या अडचणींची जाणीव ठेवून वेळो-वेळी त्यांची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले आहे त्यांचा मायाळ स्वभाव आणि आपुलकीची साथ देत असल्या कारणाने कोणीही समस्या घेऊन गेलेस लगेच तो विषय मार्गी लावून त्याचा समाधान करणारे, कामगारांना समजुन घेऊन जाणारे आधिकारी, त्यांनी आज पर्यंत केलेल्या कामाचा गौरव म्हणुन सेवक कामगार संघटनेकडून सन्मानचिन्ह देण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
त्या वेळेस प्रामुख्याने संस्थापक अध्यक्ष उमर फारुक ककमरी उपस्थित होते सोबत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय वाघमारे, सांगली जिल्हा अध्यक्ष विज्ञान लोंढे कवठेमंहकाळ तालुका अध्यक्ष सचिन वाघमारे, आरोग्य विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम आदि उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क करा. प्रशांत जगताप संपादक 9766445348 – 7385445348

