यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातून एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. वणी येथील जैन लेआऊट परिसरात असलेल्या एका अपार्टमेंट मधील बंद फ्लॅटमध्ये एका तरुणीचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळून आला आहे. मृतक युवतीच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या आहे. प्रिया रेवानंद बागेसर वय 25 वर्ष असे मृतक युवतीचे नाव असून ही घटना सोमवारी समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात विविध चर्चांना उधाण आले होते. पण ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. मग पोलिसांनी एका तपास करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
प्रिया रेवानंद बागेसर वय 25 वर्ष ही मृतक तरुणी कृष्णा अपार्टमेंट मधील फ्लॅट क्रमांक 4 मध्ये भाड्याने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी फ्लॅटचे दार बाहेरून बंद होते. पोलिसांनी दार उघडून बघितले असता, जमिनीवर प्रियाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
सपोनि माधव शिंदे यांना गुप्त बातमीदार यांनी माहिती दिली मृतक प्रिया रेवानंद बागेसर हीची फेसबुक द्वारे विनोद यांचे सोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. तिचा प्रियकर विनोद यांनी तीचा घातपात करून गावी पळून गेल्याची माहिती मिळाली. आरोपीचे नावा व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती नसताना व आरोपी हा बाहेर जिल्ह्यातील असल्याने वणी पोलिस स्टेशन मधिल कर्मचारी व अधिकारी यांनी बुध्दी कौशल्याचा वापर करून, आरोपीची माहिती काढून त्यास त्याचे मुळ गाव शीरोळी ता. वसमत जिल्हा. हिंगोली येथून चौकशी करीता ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. विनोद रंगराव शीतोळे वय २५ वर्ष असे आरोपीचे नाव आहे.

