Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे जिल्हात पत्नीने आपल्या मुलीच्या प्रियकराशी संगममत करून केली पतीची निर्घृण हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 7, 2023
in क्राईम, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे जिल्हात पत्नीने आपल्या मुलीच्या प्रियकराशी संगममत करून केली पतीची निर्घृण हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ 7020794626

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे जिल्ह्यातून एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. येथील शिक्रापूर येथे पत्नी ने आपल्या पतीची निर्घृण हत्या करून नात्याला काळीमा फासला आहे. जॉय लोबो असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पतीची हत्या करणाऱ्या सॅन्ड्रा लोबो आणि तिच्या अल्पवयीन मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे असे आरोपीचे नाव आहे.

शिक्रापूर येथे एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रियकरा बरोबर संगमत करून आपल्याच पतीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिने पतीचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचाही प्रयत्न केला. अखेर या प्रकरणी आरोपी पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलीच्या प्रियकराला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

मृतक पती आणि आरोपी पत्नी

नेमक काय आहे प्रकरण? प्राप्त माहितीनुसार, शिक्रापूर येथे जॉय लोबो या व्यक्तीची त्याच्याच पत्नीने सॅन्ड्रा लोबो आणि तिच्या अल्पवयीन मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे यांनी संगनमत करून हत्या केली होती. या घटनेतील आरोपी ॲग्नेल कसबे आणि अल्पवयीन मुलीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते.पण याच प्रेमसंबंधाला अल्पवयीन मुलीची आई सॅन्ड्रा लोबो हिची संमती होती. परंतु तिचे वडील म्हणजेच जॉय लोबो याचा विरोध होता. त्यामुळे पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि जॉय लोबो यांच्यात नेहमी वाद होत होते. आपल्या मुलीच्या प्रेमात तिचे वडील अडथळा ठरत आहेत त्यामुळे त्याला कायमचा दूर करण्याच्या उद्देशाने सॅन्ड्राने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला.

मात्र, हा कट रचण्यासाठी सॅन्ड्राने सुरुवातीला वेगवेगळ्या क्राइम वेब सीरीज पाहिल्या. त्यानंतर तिने पतीच्या हत्येचा कट रचला. सॅन्ड्रा आणि ॲग्नेल यांनी संगनमत करून मयत जॉय लोबो याचा 30 मे 2023 रोजी रात्रीच्या सुमारास घरातच डोक्यात वरवंटा घालून निर्घृण हत्या केली. दोन्ही आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी जॉयच्या मानेवर चाकूने सपासप वार करून त्याला जागीच ठार केलं.

त्यानंतर हत्या केलेल्या जॉयचं प्रेत हे घरातच ठेवलं. त्यानंतर जॉयच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून या प्रकरणातील संपूर्ण पुरावाच नष्ट करण्याच्या हेतूने 31 मे 2023 रोजी रात्रीच्या वेळी मृतदेह कारमध्ये टाकून त्यांनी गाडी सणसवाडीच्या दिशेने नेलं. त्यानंतर जवळच्या एचपी पेट्रोल पंपाच्या अलीकडे पुणे – अहमदनगर हायवे रोडलगत कार थांबवून मयतास हायवे रोडलगतच्या नाल्यात टाकून त्याचेवर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिलं.मात्र, जॉयचा मृतदेह पूर्णपणे जळला नसल्याने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ज्यासाठी पोलिसांनी तब्बल 230 सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. ज्यामध्ये पोलिसांना काही महत्त्वाची माहिती मिळाली आणि पोलीस थेट जॉयची पत्नी सॅन्ड्रापर्यंत पोहचले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचं सत्य समोर आलं. याचप्रकरणी सॅन्ड्रानंतर दुसरा आरोपी ॲग्नेल कसबे याला देखील अटक करण्यात आली. आता पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

मुंबईत हॉस्टेलच्या रूम मध्ये मिळून आला विवस्त्र अवस्थेत तरुणीचा मृतदेह; बलात्कार करून हत्या?

Next Post

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चा.

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In